सोमाटणे, ता. ८ : फुलांचे कोसळलेले बाजारभाव, वाढते तापमान, उत्पादनातील घट आणि खराब होऊ लागलेली फुले यामुळे पवनमावळ परिसरातील फुलउत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
दिवाळीनंतर सुरू होणारी लग्नसराई, विविध सण-उत्सवांमुळे फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे अल्पावधीत चांगले उत्पादन मिळत असल्याने पवनमावळातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुलशेती करतात. यंदाही अधिक बाजारभाव मिळतील, चांगले उत्पन्न होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात फुलांची लागवड केली होती. पिकाच्या वाढीसाठी खते, कीडनाशक फवारणी आणि मजुरीवर मोठा खर्चही करण्यात आला. मात्र यंदा ऐन हंगामात फुलांना मागणी घटली आहे. अचानक वाढलेल्या तापमानामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या फुलांच्या उत्पादनात जवळपास निम्मी घट झाली आहे. तसेच फुलांच्या पाकळ्या खराब होऊ लागल्याने बाजारभावही कोसळले आहेत.
सध्या झेंडूला किलोमागे २० ते ३० रुपये, बिजलीला १० ते २० रुपये, शेवंतीला सुमारे १०० रुपये, आष्टरला ६० ते ७० रुपये, जरबेराला ५० ते ६० रुपये, गुलछडीला बॉक्समागे सुमारे २०० रुपये, तर गुलाबाला प्रत्येकी सुमारे १० रुपये असा कमी दर मिळत आहे. परिणामी, पिकासाठी केलेला खर्चही निघणे कठीण होत असल्याने शेतकऱ्यांची नफ्याकडे वाटचाल ठप्प झाली आहे.
‘‘वाढत्या तापमानामुळे फुलांची प्रतही कमी झाली असून, फुले खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सध्या परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने मागणी घटली आणि बाजारभाव कोसळले.
- संजुकुमार बोडके, फुलउत्पादक शेतकरी व पिंपरी-चिंचवड फुल मार्केट कमिटीचे अध्यक्ष
PNE26W01783
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.