पिंपरी-चिंचवड

गीता मंदिर प्राथमिक शाळा

CD

चिंचवडमधील गीता मंदिर प्राथमिक शाळेत ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक महेंद्र भोसले यांनी सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन केले. सर्व महिला पालकांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात तळ्यात मळ्यात, संगीत खुर्ची, पिनांची साखळी तयार करणे, बादलीत चेंडू फेकणे असे खेळ घेण्यात आले. महिला पालकांसह शाळेतील महिला शिक्षकांनीही या खेळात उस्फूर्तपणे सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या महिलांचा सत्कार करण्यात आला. शिक्षिका अपर्णा संकपाळ यांनी संयोजन केले.

एसपीएम स्कूल
यमुनानगर निगडी येथील एसपीएम इंग्रजी आणि मराठी माध्यम शाळेत टीम इनस्पार्क यांच्या सहयोगाने ‘लॅब ऑफ क्युरेओसिटी - २१ स्किल्स’ या उपक्रमाचे भव्य प्रदर्शन व शाळेच्या ॲक्टिव्हिटी क्लबचे उद्‍घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, भारत माता व संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख अतिथी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संपर्कप्रमुख उन्नीकृष्णन पिल्ले यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या पल्लवी शानभाग यांनी प्रास्ताविक केले. या प्रदर्शनामध्ये विविध विषयांवर आधारित १९ स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्यामध्ये नृत्यकला, नाट्य व रंगभूमी, चित्रकला, हस्तकला, जीवन-कौशल्य, बौद्धिक खेळ, एआय व रोबोटिक्स, स्वसंरक्षण, ॲबॅकस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, धनुर्विद्या, कराटे, भारतीय युद्धकौशल्य याबाबत माहिती देण्यात आली. शोभा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. वैभवी फडके यांनी आभार मानले.

ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला
ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. श्री जैन विद्याप्रसारक मंडळाचे महासचिव राजेंद्रकुमार मुथा व सहसचिव अनिलकुमार कांकरिया यांनी महाविद्यालयातील कार्यरत महिलांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्राचार्य भारती सारंगा यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे आस्थापना विभाग प्रमुख भारती सतीश यांच्या वतीने सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. परमेश्वर होरे यांनी प्रास्ताविक केले. सारिका प्रांजळे यांनी सूत्रसंचालन केले. बालाजी कोकरे यांनी आभार मानले.

श्री फत्तेचंद जैन विद्यालय
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. ‘महिला दिन साजरा करणे म्हणजे महिलांच्या धैर्याला, सहनशीलतेला व कर्तृत्वाला सलाम करणे,’ असे प्रतिपादन प्राचार्या सुनीता नवले यांनी केले. तर उपप्राचार्य अनिल गुंजाळ यांनी आपल्या भाषणातून प्रभावी व प्रेरणादायी महिलांचा जीवनपट उलगडवला. याप्रसंगी निकिता काळे, आर्या बंडगर व दिया सोळंकी या विद्यार्थिनींनी महिला दिनाचा इतिहास व महिलांच्या कर्तृत्वाचा महिमा सादर केला. सांस्कृतिक विभाग प्रमुख ताहेरा तांबोळी व स्नेहल चानोदिया यांनी नियोजन केले. यशवंत जरांगे यांनी सूत्रसंचालन तर सुनील सकट यांनी आभार मानले. यावेळी तेजस्विनी कालेकर, साधना भळगट, भाऊसाहेब लोखंडे आदी उपस्थित होते.

श्री गुरू गणेश विद्यामंदिर
श्री गुरू गणेश विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संतोष सुरवसे यांनी प्रास्ताविक करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्य हनुमंत मारकड यांनी महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती दिली. ईश्वरी आगवाने, जिया पटेल, अनुष्का आगवाने, प्रतीक्षा कसबे या विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रातील महिलांची वेशभूषा केली व त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. आरती बनसोडे, रुद्रांश बाबर, लक्ष्मी तलवार या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. पर्यवेक्षक हितेंद्र लोखंडे, मारुती तोत्रे, संभाजी चव्हाण, लक्ष्मण गुंजाळ, अविनाश शिरसाट यांनी संयोजन केले. अंश पतंगे, कृष्णा मराठे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. सीमा जंगले यांनी आभार मानले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT