पिंपरी-चिंचवड

आयडीटीआरमध्ये पोलीस शिपाई कौशल्य चाचणी

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ९ ः पोलीस शिपाई चालक पदाच्या भरतीकरीता अर्जदारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी १० आणि ११ मार्च रोजी भोसरी येथील केंद्रीय रस्ते चालक प्रशिक्षण व संशोधन संस्थेत (आयडीटीआर) होणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत होणारी वाहन चालक (अनुज्ञप्ती) चाचणी सकाळी सात वाजल्यापासूनच सुरू होणार आहे. वाहन चालकांनी लवकरच येऊन अनुज्ञप्ती चाचणी करण्याचे आवाहन आरटीओने केले आहे.
मोटर वाहन कायद्यानुसार सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना घेणे आवश्यक आहे. त्याआधी नागरिकांना दुचाकी किंवा चारचाकीसाठी पक्के वाहन परवाना काढायचे असेल तर अनुज्ञप्ती चाचणी द्यावी लागते. यासाठी अर्जदाराला ऑनलाइन नोंदणी करावी लागते. नंतर आरटीओने ठरवून दिलेल्या तारखेला अर्जदारास नियोजित ठिकाणी उपस्थित राहून परीक्षा द्यावी लागते. पिंपरी चिंचवड आरटीओत दररोज शिकाऊ आणि नूतनीकरण असे दोन्ही मिळून सरासरी ४०० ते ४५० हून अधिक वाहन चालक अनुज्ञप्ती चाचणीसाठी ऑनलाइन अर्ज करतात. पक्की अनुज्ञप्ती प्राप्त करण्याकरिता पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडून ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयडीटीआर) भोसरी येथे मोटारसायकल विथ गिअर, मोटारसायकल विदाऊट गिअर, ऑटोरिक्षा तसेच पुनर्चाचणी परीक्षा व मोटार कार याची चाचणी परीक्षा घेतली जाते. पण, आयडीटीआरमधील टेस्टिंग ट्रॅकवर पोलीस शिपाई चालक पदाच्या भरतीकरीता अर्जदारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणीसाठी १० व ११ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे वाहन चालविण्याची (अनुज्ञप्ती) चाचणी सकाळी सात वाजल्यापासूनच सुरु होणार आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाहीच; 2 मे'पर्यंत पोलिस कोठडीत वाढ

Hadapsar Fire : सिलेंडरमधून गॅस गळती होवून लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक, दोनजण जखमी

PBKS vs RR Live: २,४,६,४,४,१, ४! प्रियांश आर्यने ७ चेंडूंत राजस्थानला झोडले; जोफ्रा आर्चर कर्णधार रियानवर संतापला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT