पिंपरी-चिंचवड

सन्मान, व्याख्याने, विविध स्पर्धांनी महिला दिन साजरा

CD

पिंपरी, ता. ९ : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचे सत्कार समारंभ, महिला सक्षमीकरणावर आयोजित व्याख्याने, विविध स्पर्धा, काव्य मैफली अशा वातावरणात शहरात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारचा (ता.८) सुटीचा दिवस आणि महिला दिन एकत्र आल्याने शहरातील लहान मोठी सभागृह, उद्याने या ठिकाणी महिला विषयक कार्यक्रम पार पडले. महिलांनी पुढाकार घेऊन विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

गीतगायन, भारूड, नृत्य सादरीकरण
कविता, नाट्य छटा, गीतगायन, भारूड, नृत्य, विनोद सादरीकरण अशा कार्यक्रमांनी चिंचवड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रामध्ये रविवारी महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पुराणकाळापासून आतापर्यंत होऊन गेलेल्या कर्तबगार महिलांचा परिचय संवादरुपात १९ महिलांनी सादर केला. संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर यांनी या कर्तबगार महिलांच्या जीवनकार्यावर आधारित गीत लिहिले होते. याला संघाच्या कार्याध्यक्ष प्रिया जोशी यांनी शब्दांचा साज चढविला. यावेळी महिलांनी स्वत: तयार केलेल्या खाद्य पदार्थांचे आणि वस्तूंचे स्टॉलही ठेवले होते.

क्रिकेट स्पर्धा, सांगीतिक मैफल
स्वरोपासना ग्लोबल म्युझिक ॲकॅडमीच्या पुनावळे आणि वाकड शाखांच्या वतीने दोन दिवसीय पुनेविला प्रीमियर लिग ३ या महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या ‘राॅयल शेरनीज’ या विजेत्या संघाला रविवारी (ता.८) करंडक प्रदान करून गौरविण्यात आले. पुनेविला प्रीमियर लिग ३ या स्पर्धेत झाँसी फायटर्स, दुर्गा वॉरियर्स, रॉयल शेरनीज, मराठा स्ट्राईकर्स या संघांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचा समारोप गायक अथर्व कुलकर्णी यांनी सांगीतिक मैफलीने केला. त्यामध्ये कृतिका शिरसाठ, कल्पा फडते, आरती धांडे, मीनल चव्हाण, चैतन्य शरण, भाग्यदा कुलकर्णी, योगेंद्र लांजे यांनी गायनसाथ केली. श्रद्धा कांबळे आणि उमा शाह यांनी स्पर्धा संयोजनात सहकार्य केले.

महिलांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती
कासारवाडी परिसरातील एक हजारपेक्षा अधिक महिलांनी छत्रपती शिवरायांची महाआरती करून अनोखा महिला दिन साजरा केला. सकल हिंदू समाज कासारवाडी यांच्यावतीने आयोजित हिंदू संमेलन गारजाई देवी चौकाजवळ उत्सहात संपन्न झाले. पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य बागेश्री मंठाळकर यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी मीनल शुक्ल, सामाजिक कार्यकर्ते तथा लेखक नरेंद्र पेंडसे, धनंजय चंद्राद्रे, जयवंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन ज्ञानराज तटीकुंडलवार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT