पिंपरी-चिंचवड

चौदा वर्षांवरील मुलींसाठी ‘एचपीव्ही लस’ मोफत

CD

पिंपरी, ता. ९ : ‘‘आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारतर्फे महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळेत १४ वर्षे पूर्ण, पण १५ वर्षांखालील मुलींसाठी मोफत लस दिली जाणार आहे. पुढील तीन महिने ही मोहीम सुरू राहील,’’ अशी माहिती महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारतर्फे महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २८ फेब्रुवारीपासून ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत वैद्यकीय विभागाने सांगवी रुग्णालयात मोहिमेचा प्रारंभ केला. त्यात २४ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. ‘एचपीव्ही’ लस सुरक्षित, प्रमाणित आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी असल्याने पालकांनी मुलींचे लसीकरण वेळेत करून घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

येथे उपलब्ध आहे लस
महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, तालेरा रुग्णालय चिंचवड, नवीन भोसरी रुग्णालय, इंदिरा गांधी प्रसूतिगृह सांगवी रुग्णालय सांगवी, नवीन थेरगाव रुग्णालय, जिजामाता रुग्णालय पिंपरी, हभप प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय येथे लस उपब्ध आहे.

पालकांना सूचना
लस घेण्यासाठी संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधून मोफत ‘एचपीव्ही’ लस मिळेल. लस घ्यायला येताना आधार, शाळेचे (आय कार्ड) किंवा तत्सम ओळखपत्र घेऊन आणि भरपेट नाश्ता करून पालकांनी मुलींना घेऊन यावे.

‘एचपीव्ही’ व्हायरस हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा मुख्य कारणीभूत घटक आहे. योग्य वयात म्हणजे १५ वर्षांपूर्वी दिलेली ही लस मुलींना दीर्घकालीन संरक्षण देते. त्यामुळे पालकांनी १४ वर्षांच्या मुलींचे लसीकरण वेळेत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

SCROLL FOR NEXT