पिंपरी-चिंचवड

‘टुडी-इको’साठी रुग्ण, नातेवाइकांची ससेहोपालट

CD

पिंपरी, ता. ९ : हृदयविकाराच्या निदानासाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘२-डी इको’ चाचणीसाठी रुग्णांना बराच वेळ तिष्ठत राहावे लागल्याचा प्रकार महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात सातत्याने घडत आहे. या चाचणीसाठी वेळ निश्चित असतानाही आगाऊ वेळ घेऊनच ही तपासणी रुग्णांना करावी लागत आहे. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयातील रुबी अल् केअरमध्ये हा प्रकार घडत असून यामुळे येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे.

गरजू रुग्णांना हृदयविकाराशी संबंधित महागातल्या चाचण्या कमीत कमी खर्चात करता याव्या यासाठी पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात रुबी अल् केअरचे युनिट कार्यरत आहे. येथे ‘टुडी इको’ या तपासणीसाठी रुग्णांनी सकाळी १० ते दुपारी दोन ही वेळ दिलेली आहे. या वेळेनुसार येथे अनेक रुग्ण सकाळी दहा वाजल्यापासूनच रांगा लावून बसलेले असतात. मात्र, तपासणी करण्यासाठी डॉक्टरच उशिरा येत असल्याने रुग्णांना वाट पहावी लागत आहे. ठरलेल्या वेळेतही संबंधित डॉक्टर न आल्याने चार तास वाट पाहून नाइलाजास्तव तपासणीसाठी इतरत्र जावे लागल्याने वेळ व पैसा दोन्ही गेल्याची खंत येथे येणाऱ्या रुग्णांनी व्यक्त केली आहे.

जिजामाता रुग्णालयात रुबी अल् केअर व्दारे ‘टुडीइको’ ची तपासणी केली जाते. ही तपासणी करणारे डॉक्टर हे पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातही तपासणी करतात. त्यामुळे ते ठराविक वेळेत व अपॉईंटमेंट घेऊनच तपासणी करत असल्याचे स्पष्टीकरण रुग्णालयाने दिले आहे. मात्र, पिंपरी चिंचवडमधील लोकसंख्या व या दोन्ही रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता एवढ्या महत्त्वाच्या तपासणीसाठी दोन रुग्णालयांमध्ये एकच वैद्यकीय तज्ज्ञ का? असाही प्रश्‍न रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत.

‘टुडी-इको ही अत्यंत महत्त्वाची तपासणी आहे. मी या तपासणीसाठी सकाळी १० वाजेपासून थांबले होते. मात्र, अजून डॉक्टर आलेले नाहीत. रुग्णांची गैरसोय होणार असेल तर वेगळ्या विभागाचा उपयोग काय?
- महिला रुग्ण

ज्या दिवशी डॉक्टर नव्हते, अशी रुग्णांची तक्रार आहे त्या दिवशी चार तपासण्या झालेल्या आहेत. संबंधित डॉक्टर वायसीएम रुग्णालयातही कार्यरत आहेत. त्यामुळे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी वेळ घेणे गरजेचे आहे.
- डॉ. अलवी नारेस, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिजामाता रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT