पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

दिव्यांसाठी टायमर लावा
आकुर्डी रेल्वे स्थानकापासून रावेतच्या धर्मराज चौकाकडे जाणाऱ्या दोन्ही रेल्वे बोगद्यांमधील नवीन लावलेले दिवे दिवसा देखील चालू राहात असून आवश्यकता नसताना विजेचा अपव्यय होत आहे. तसेच बोगद्याच्या पुढे आणि मागे नवीन लावलेल्या शोभिवंत दिव्यांमधील काही दिवे बिघडलेले आहेत. तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने बिघडलेले दिवे चालू करावेत आणि निष्कारण वाया जाणारा विजेचा वापर बंद करावा. अनेक ठिकाणी दिवे चालू - बंद होण्यासाठी टायमरचा वापर केला जातो. शक्य असल्यास येथे दिव्यांसाठी टायमरचा वापर करावा.
- विलास खरे, रावेत
E26V83569


अनधिकृत पार्किंगवर कारवाई हवी
ट्रान्सपोर्टनगर, भक्ती-शक्ती जवळील मुकाई चौक ते निगडी बीआरटीएस रोडला ‘नो पार्किंग झोन’मध्ये वाहने कायम उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडी होऊ लागली आहे. पोलिसांनी आताच या वाहनांवर कारवाई केली नाही, तर ही समस्या आणखी बिकट होईल.
- डॉ. संतोष पडवळ, प्राधिकरण-निगडी
26V83568

पडीक वाहनांचा लिलाव करा
सांगवी पोलिस ठाण्याच्या आवारात अपघातग्रस्त, गुन्ह्यात सापडलेली दुचाकी वाहने उभी केलेली आहेत. अनेक दिवसांपासून ही वाहने एकाच जागी असल्याने त्यावर धूळ, माती साचलेली आहे. येथे पोलिस कर्मचाऱ्यांचा सतत वावर असतो. तसेच तक्रार करण्यास अथवा तत्सम कामांकरता येणाऱ्या नागरिकांची देखील ये-जा करतात. या वाहनांमुळे डेंगी, हिवताप या सारख्या आजारांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगवी पोलिसांनी तातडीने या वाहनांचा लिलाव करुन जागा मोकळी व स्वच्छ करावी.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE26V83559

खड्डे लवकर बुजवा
आकुर्डीहून निगडीकडे जाण्याच्या रस्त्यावर टिळक चौकाच्या अलीकडे मागील काही वर्षांपासून एक खड्डा पडला आहे. अनेक वेळा हा खड्डा बुजविण्यात आला आहे. तरीही या खड्डयाने चांगलेच ‘बाळसे’ धरले आहे. याच रस्त्यावर पुढे भक्ती-शक्ती चौकाच्या अलीकडे असाच खड्डा अनेक वर्षांपासून पडला आहे. वाहनचालकांना हे दोन्ही खड्डे चुकविण्यासाठी कसरत करावी लागते. प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत.
- शिवराम वैद्य, निगडी
PNE26V83561

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: काँग्रेसचा ‘लाडकी बहीण’ द्वेषाचा क्रूर चेहरा उघड: चंद्रशेखर बावनकुळे; पैसे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र!

Diabetes Breathalyzer : डायबिटीज रुग्णांसाठी खुशखबर! ना रक्त-ना दुखणं...आता श्वासातून कळणार शरीरातली साखर, जाणून घ्या काय आहे ही मशीन?

Devendra Fadnavis : नाशिकच्या गोदाकाठी आज फडणवीसांची तोफ धडकणार; ठाकरे बंधूंना काय प्रत्युत्तर देणार?

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT