पिंपरी-चिंचवड

मांगल्याच्या वातावरणात ‘गौरीपूजन’

CD

पिंपरी, ता. १८ ः शहरात सध्या गणेशोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. शुक्रवारी घरोघरी महालक्ष्मी म्हणजेच गौरीपूजन सोहळा अत्यंत पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गुरुवारी अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन झाल्यानंतर, आज ज्येष्ठा नक्षत्रावर महिलांनी लाडक्या गौराईचे मनोभावे पूजन केले.
आकर्षक आरास
शहरातील सोसायट्यांमध्ये गौरींच्या स्वागतासाठी आणि पूजनासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. अनेक घरांमध्ये पारंपरिक मुखवट्यांच्या गौरी, तर काहींकडे उभ्या गौरी किंवा मातीच्या घटांची स्थापना करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुले, विद्युत रोषणाई आणि सुबक रांगोळ्यांनी गौराईचे मखर सजले होते. महिलांनी पारंपरिक नऊवारी साड्या आणि दागदागिन्यांनी गौरींचे रूप अतिशय देखणे आणि विलोभनीय साकारले होते.
छप्पन भोग नैवेद्य-सुवासिनी पूजन
गौरी पूजनाचा मुख्य मान असलेल्या महाप्रसादासाठी आज घरोघरी लगबग सुरू होती. गौराईला प्रामुख्याने सोळा भाज्यांची मिश्र भाजी, पुरणपोळी, खीर-कटाची आमटी, अंबाडीची भाजी, करंज्या, लाडू आणि विविध प्रकारच्या कोशिंबिरी असा छप्पन भोगाचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. दुपारच्या शुभमुहूर्तावर आरती करून गौरींना नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर शेजारी-पाजारी आणि नातेवाईक सुवासिनींना हळदी-कुंकवासाठी आणि ‘ओटी’ भरण्याचे आमंत्रण देण्यात आले होते.
सांस्कृतिक कार्यक्रम
गौरी पूजनाच्या निमित्ताने रात्रीच्या वेळी महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, झिम्मा, फुगड्या आणि मंगळागौरीच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे घराघरांमध्ये आनंदाचे उधाण आले होते. शनिवारी (ता. १९) मूळ नक्षत्रावर लाडक्या गौरींचे आणि सोन्याच्या पावलांनी आलेल्या महालक्ष्मींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन केले जाणार आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT