सोमाटणे, ता.२८ ः सोमाटणे येथील चौराईदेवी उत्सवाला शनिवारी (ता.२८) विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरुवात झाली.
चौराईदेवी डोंगरावरील निसर्गाच्या कुशीत हे मंदिर आहे. उत्सव समितीच्या वतीने देवीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उत्सवाची सुरुवात सोमाटणे गावच्या भाविकांच्या उपस्थितीत देवीच्या दुग्ध स्नानाने करण्यात आली. यानिमित्त महापूजा,अभिषेक, आरती, महाप्रसाद आदी धर्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी
केली. रात्री भजन प्रवचन, महाआरती, महाप्रसाद आणि पहाटे ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक आदी
कार्यक्रम होणार आहेत.