चिंचवडगावातील केशवनगर परिसरातील साई चौक गणपती मंदिर परिसर अत्यंत वर्दळीची जागा असून या चौकातून शाळेच्या बस सकाळ, दुपार, सायंकाळी येत-जात असतात. तसेच विद्यार्थीही सायकलवरून येत असतात. दुहेरी वाहतुकीमुळे या चौकात वाहने वळवताना खूप त्रास होतो. काही किरकोळ अपघात देखील झाल्याचे समजते. त्यामुळे या चौकात एकेरी वाहतूक होणे गरजेचे आहे. प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करून वाहतूक सुरक्षित होईल, असे नियोजन करावे.
- रमेश देव, चिंचवड