पिंपरी, ता.३० ः सध्या हिंदू समाज विखुरला आहे त्यामुळे सर्वांनी जाती-पाती, पंथभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन सज्जनगडाचे महंत अजय बुवा रामदासी महाराज यांनी हिंदू समाजाला केले.
पूर्णानगर आणि शिवतेजनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘विराट हिंदू संमेलन’ पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडा संकुल मैदान येथे पार पडले. या संमेलनाला हजारो हिंदू बांधव व भगिनी उपस्थित होत्या. या प्रसंगी प्रभु श्रीमाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. शाळकरी मुलांनी पारंपारिक युद्धकला, तलवारबाजी, दांडपट्टा, वासुदेव, पिंगळा आणि मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके यावेळी सादर केली. हिंदू एकत्रितेच्या शपथेने वातावरण फुलून गेले. प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी तर आभार राजेंद्र कुलकर्णी यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.