पिंपरी-चिंचवड

कॉपीराईट कारवाई पथकाला पिंपरीत व्यापाऱ्यांचा विरोध

CD

पिंपरी, ता. ३० : पिंपरी मार्केटमधील साई चौक येथे सोमवारी (ता. ३०) कॉपीराईट कारवाईसाठी आलेल्या पथकाला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केला. पैसे उकळण्यासाठी अशा प्रकारची कारवाई वारंवार केली जात असल्याचा आरोप करीत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली.
पिंपरी मार्केट येथे मागील दहा ते बारा दिवसांत कॉपीराईट कारवाईच्या नावाखाली पथकाने तीन वेळा विविध दुकानांवर छापा टाकला. सोमवारीही कारवाईसाठी पथक आले. यावेळी व्यापाऱ्यांनी दाखवलेल्या विरोधामुळे आणि संतापामुळे संबंधित पथक माघारी फिरले. या प्रकारानंतर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आपली दुकाने बंद ठेवली.

पिंपरी मार्केट येथे कॉपीराईटच्या नावाखाली कारवाईसाठी येणारे अधिकारी हे कोणत्याही कायद्याचे पालन करीत नाहीत. केवळ व्यापारी वर्गाला त्रास देऊन पैसे उकळण्याच्या हेतूने ही पथके कारवाईसाठी येतात. परंतु, खरंच एखाद्या दुकानात कॉपीराईट कारवाई करायची असल्यास आवश्यक कायद्याच्या तरतुदीने दुकानातील संबंधित मालाची अधिकृत संस्थेकडून खात्री केल्यानंतरच पुढची कारवाई करावी. मात्र, तसे न करता हे अधिकारी चुकीच्या पद्धतीने दुकानदारांना त्रास देत आहेत.
- श्रीचंद आसवानी, अध्यक्ष, पिंपरी मर्चंट फेडरेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT