पिंपरी, ता. ३१ : श्री हनुमान जयंतीनिमित्त मोशी गाव येथे मिरवणुकीचे आयोजन केले आहे. यावेळी पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीला अडथळा होवु नये, यासाठी मिरवणूक मार्गावरील वाहतुकीत गुरुवारी (ता. २) दुपारी चार ते रात्री दहा या वेळेसाठी बदल करण्यात आला आहे.
पुणे-नाशिक महामार्गाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौक मोशी येथे येण्यास वाहनांना मनाई असून, या मार्गावर येणारी वाहने भारतमाता चौक येथून इच्छितस्थळी जातील. तसेच वाय पॉइंट कुदळेवस्ती येथून अनुष्का सोसायटी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येणारी वाहने भारतमाता चौक येथून जातील.
---