पिंपरी-चिंचवड

बनावट कागदपत्राप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

CD

पिंपरी : रुग्णालयाच्या आरक्षणात फेरबदल करण्यासाठी बनावट सह्या करून बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चऱ्होली बुद्रूक येथील वडमुखवाडी येथे घडला. विजया कोरडे, संपत कोरडे, बाई कोरडे, ज्ञानेश्वर कोरडे, सोमनाथ कोरडे, सुनीता दळवी (सर्व रा. वडमुखवाडी, चऱ्होली बुद्रूक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पार्वती कोरडे यांनी दिघी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादीची मिळकत बळकावण्याच्या उद्देशाने फिर्यादी आणि त्यांच्या पतीच्या बनावट सह्या केल्या. त्या आधारे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगररचना व विकास विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्र सादर केले. जमिनीवरील रुग्णालयाचे आरक्षण बदलण्यासाठी हा बनावट दस्तऐवज वापरला.

तरुणाला मारहाण
पिंपरी : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला एकाने हातातील लोखंडी कड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना किवळे येथे घडली. केशवकुमार विजय मिश्रा असे जखमीचे नाव असून, त्‍यांनी देहूरोड पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल जमदाडे (रा. किवळे, मूळ - बिहार) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा
पिंपरी : जुन्या भांडणावरून दोघा भावांना बेदम मारहाण केल्याची घटना भोसरी एमआयडीसी परिसरात घडली. या प्रकरणी शुभम नगगिरे (रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य कांबळे, प्रकाश विद्यागज, सारंग ओरसे, सुमीत कांबळे (सर्व रा. बालाजीनगर, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

महाविद्यालयात विद्यार्थ्याला मारहाण
पिंपरी : भांडण सोडविल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याला लोखंडी खुर्चीने मारहाण केल्याची घटना वाकड परिसरातील एका महाविद्यालयात घडली. ओम्कार पाटील (रा. चिंचवड) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून, त्‍यांनी हिंजवडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश नडे, आदिनाथ ढमाले, ओम्कार कोल्हे (वय २२, सर्व रा. काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT