पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेला ९४७ काेटींचे उत्पन्न

CD

पिंपरी, ता. ३१ : महापालिका कर संकलन व कर आकारणी विभागाला २०२५-२६ आर्थिक वर्षात ९४७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. शहरातील सात लाख ३२ हजारांपैकी सहा लाख २७ हजार ७९० मिळकतधारकांनी करभरणा केला आहे.

गेल्या वर्षभरापासून थकबाकीदारांवर जप्ती, नळजोड तोडणे, नावे प्रसिद्ध करण्याची कारवाई केली. जाहिरातींद्वारे जागृती केली. कर भरण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध होती. मार्चमध्ये ‘अभय’ योजना राबवली. त्याला ८३ हजार ४७० थकबाकीदारांनी लाभ घेऊन १९७ कोटी १८ लाख रुपयांचा कर भरला. त्यांना ४५ कोटी १३ लाख रुपयांची सवलत मिळाली.

अशी झाली वसुली (कोटी रुपयांत)
भरणा प्रकार / रक्कम
ऑनलाइन / ७०६.७२
रोख / ८३.८८
धनादेशाद्वारे / ११०.५२
ईडीसी / ००.०६
डीडी / ०७.०९

कर भरलेल्या मिळकती
प्रकार / संख्या
औद्योगिक / ४,७८३
निवासी / ५,५२,०४२
बिगरनिवासी / ५२,२११
मिश्र / १३,६७४
मोकळ्या जमिनी / ५,०४९
इतर / ३१

कर संकलन विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कामकाजामुळे आणि नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सुलभ सुविधांमुळे कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे.
-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त,  महापालिका

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT