पिंपरी-चिंचवड

विजेअभावी वाहन योग्यता चाचणी केंद्र बंद

CD

पिंपरी, ता. १ ः वाहनांची योग्यता (फिटनेस) तपासणी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी उभारण्यात आलेले अत्याधुनिक स्वयंचलित चाचणी केंद्र सध्या वीजपुरवठ्याअभावी बंद आहे. गेल्या महिन्याभरापासून जुन्या पद्धतीने होणारी वाहन योग्यता नोंदणी प्रक्रियाही ठप्प आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत.
यापूर्वी वाहनांची तपासणी पूर्णपणे मनुष्यबळावर आधारित होती. निरीक्षक वाहनांचे ब्रेक, दिवे तपासून तसेच सुमारे २५० ते ४०० मीटर अंतरावर वाहन चालवून योग्यता प्रमाणपत्र देत असत; मात्र या पद्धतीत त्रुटी राहण्याची शक्यता असे. चाचणीचा निकाल निरीक्षकांच्या वैयक्तिक मतावर अवलंबून राहत होता. त्यामुळे प्रवासी व मालवाहतूक वाहनांची सुरक्षा आणि तांत्रिक स्थिती तपासण्यासाठी मोशी येथील दहा एकर जागेत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) स्वयंचलित चाचणी केंद्र उभारले आहे. ऑक्टोंबर २०२५ दरम्यान या केंद्राचे आणि इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. केंद्रात यंत्रसामग्री बसविणे, इमारतीतील प्लंबिंग, इलेक्ट्रिक कामे आणि बाहेरील सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले. पण, काम पूर्ण होऊन केवळ वीज आणि रस्त्याअभावी हे चाचणी केंद्र गेले पाच महिन्यापासून बंद आहे. आता चाचणी केंद्रापर्यंत जाण्यासाठी तात्पुरता रस्ता बनविण्यात आला असला तरी अजूनही वीजजोड देण्यात आलेला नाही. त्यामुळे चाचणी केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की आरटीओ प्रशासनावर ओढावली आहे.

वीजपुरवठ्याची जोडणी मिळण्यासाठी आणि वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे. स्वयंचलित योग्यता चाचणी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT