पिंपरी-चिंचवड

राज्यमंत्र्यांचे पत्र; पोलिसांची धावपळ

CD

पिंपरी, ता. ४ : ‘‘हिंजवडीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीतील विश्रांती कक्षाच्या वापराबाबत तक्रारींची चौकशी करावी. आवश्यक प्रतिबंधक व तथ्य पडताळणी उपाययोजना कराव्यात,’’ अशा सूचना देत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलिसांना पत्र दिले आहे. तर, असा कोणताही प्रकार चौकशीत आढळला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांना दिलेल्या पत्रात मिसाळ यांनी म्हटले आहे की, ‘‘एका नामांकित कंपनीतील कार्यालयात पुरुष विश्रांती कक्ष वापराबाबत काही तक्रारी आल्या आहेत. काही विशिष्ट गटाकडून धार्मिक विधींसाठी या कक्षाचा नियमित वापर केला जात असून त्या वेळेत इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश मर्यादित केला जात असल्याची बाबही निदर्शनास येत आहे. यामुळे तेथील उपलब्ध सुविधांचा एकसमान वापर, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि संस्थात्मक शिस्त यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या माहितीची सत्यता तपासणे आवश्यक आहे. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांशी स्वेच्छेने व गोपनीयतेने संवाद साधणे, त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव, छळ किंवा असुविधा भासत आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे.’’
‘‘या पत्रानंतर हिंजवडी पोलिसांनी संबंधित कंपनीत जाऊन तपासणी केली. कर्मचारी व कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. काहीही गैरप्रकार आढळला नाही. मात्र, असा प्रकार असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,’’ असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी केले आहे.

पोलिसांच्या हद्दीबाबत राज्यमंत्री अनभिज्ञ
हिंजवडी परिसरातील एका कंपनीबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले आहे. मात्र, हिंजवडी परिसराचा समावेश पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कक्षेत येतो. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांच्या हद्दीबाबत राज्यमंत्रीच अनभिज्ञ असल्याचे या पत्रातून दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Hardik Pandya Not Playing Today? हार्दिक MI vs LSG सामना का खेळत नाही? मुंबई इंडियन्सने दिले महत्त्वाचे अपडेट्स; गर्लफ्रेंड कल्चर बंद होणार असल्याने झालाय का नाराज?

पुण्याच्या टीमकडून IPL गाजवणाऱ्या गोलंदाजानं TMC उमेदवाराला लोळवलं; सलग दुसऱ्यांदा झाला आमदार

Daund crime incident: दौंडमध्ये मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून आरोपी थेट पोलिस ठाण्यात हजर

Nagpur MD Drugs News : नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’चा धडाका; ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त, तरीही एमडी शहरात येते कुठून?

Police Recruitment News: अगरवाडगावचे मुस्तकीम रब्बानी पठाण पुणे शहर पोलीस दलात निवड

SCROLL FOR NEXT