पिंपरी, ता. ८ : एका इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या सहा जणांना रहाटणी अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तीन तास प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले. आशाशंकर प्लाझामध्ये शुक्रवारी (ता. ८) पहाटे अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. सागर शिंदे, अपूर्वा शिंदे, अनंतकुमार, वैशाली सिंग, शुभांगी सिंग, प्रखर सिंग पहाटे अडीचच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये बसले. निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने लिफ्ट तळमजला आणि पहिल्या मजल्यामध्ये अडकली. इमारतीतील रहिवाशांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी प्रथम लिफ्टमध्ये अडकलेल्यांना मोकळी हवा मिळेल याची दक्षता घेतली. त्यानंतर बाहेरचे लोखंडी गज कापून तांत्रिक रचनेत बदल दरवाजा उघडण्यात जवानांना यश आले.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.