पिंपरी-चिंचवड

मेट्रोसाठी झाडे काढली, साडेपाच हजार नव्याने लावली

CD

पिंपरी, ता. ५ ः हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या झाडांच्या बदल्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पाच हजार ५०० नवीन वृक्षांची लागवड केली. या मोहिमेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला असून सर्व वृक्षांचे ‘जिओटॅगिंग’ करण्यात आले आहे.
मेट्रो मार्गावरील खांब, स्थानके आणि जिन्यांच्या उभारणीमध्ये एकूण एक हजार ३०५ झाडे बाधित झाली होती. पीएमआरडीएने पर्यावरणपूरक भूमिका घेत यापैकी ५५७ झाडे तोडली, तर उर्वरित ७४८ झाडांचे सुरक्षितरीत्या केले. विशेष म्हणजे पुनर्रोपण केलेल्या ८० टक्के वृक्षांनी मूळ धरले असून या झाडांना आता फुले आणि फळे येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, पर्यावरणाची हानी भरून काढण्यासाठी तब्बल पाच हजार ५०० नवीन झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. ही नवीन झाडे पशुसंवर्धन विभाग, ताथवडे येथील कास्टिंग यार्ड, बावधनचे एनडीए वनक्षेत्र, एनसीएल, पंचवटी, हिंजवडी फेज-३ मधील एमआयडीसी प्लॉट, राजभवन आणि कृषी महाविद्यालय यासारख्या शहराच्या विविध भागांत लावण्यात आली आहेत.

झाडांना ‘क्यूआर कोड’ची जोड
प्रत्येक झाडावर एक ‘क्यूआर कोड’ लावण्यात आला आहे. नागरिकांनी मोबाईलवरून हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास, त्यांना संबंधित वृक्षाचे नाव, त्याची प्रजाती आणि त्याचे पर्यावरणातील महत्त्व याबाबतची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.

मेट्रो मार्ग-३ च्या कामात केवळ पायाभूत विकासालाच नव्हे, तर पर्यावरण संवर्धनालाही पीएमआरडीएने तितकेच प्राधान्य दिले आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला असून पुनर्रोपित झाडांना आलेली फळे-फुले हे या मोहिमेच्या यशाचे गमक आहे.
- डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निधी मंजुरीसाठी मागितली लाच, ६ लाखांची रोकड स्वीकारताना मंत्रालयातला अधिकारी अडकला सापळ्यात; खारघरमध्ये रंगेहाथ पकडलं

तुम्हीच लग्न करून मुलं का जन्माला का घालत नाही, शंकराचार्यांचा सरसंघचालक मोहन भागवतांना सवाल

भारताची लेक बनणार वॉशिंग्टनची महापौर? कोण आहे ३१ वर्षीय रिनी संपत?

Latest Marathi News Live Update : खारघरमध्ये लाच घेताना मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक

Sunetra Pawar: अवकाळी पावसामुळे हातात आलेलं पीके गेली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, बारामतीतील शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी..

SCROLL FOR NEXT