पवनानगर, ता.१० ः गेल्या काही वर्षांपासून पवना धरण परिसरात संपादित जागेवर धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करुन बंगले, फार्म हाऊस, हॉटेल व्यवसाय थाटले आहे. त्याविरुद्ध पाटबंधारे विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत वारु हद्दीतील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली. मात्र, आता विभागाने बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलला आहे. परंतु ५५ वर्षांपासून पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुर्नवसन न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या जागांवर छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांची अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. या कारवाईच्यावेळेस पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी माणिक शिंदे, शाखा अभियंता रजनीश बारिया यांच्यासह धरण सुरक्षा रक्षक उपस्थित होते.
धनदांडग्यांना अभय ?
पवना धरणाच्या बांधकामापासून परिसरातील डोंगरावर, पाण्याला लागूनच धनदांडग्यांनी मोठमोठे बंगले बांधले आहेत. परंतु त्यांच्या अतिक्रमणांबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी कानाडोळा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेतकऱ्यांचे मागील ५५ वर्षांपासून पुर्नवसन झाले नाही. त्यांना पर्यायी जमिनी मिळाल्या नाहीत. अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. ज्यांच्याकडे जमिनी ताब्यात आहेत, अशा शेतकऱ्यांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहे. त्यांच्यावर कारवाई करु नये. सर्वात आधी धनिकांची अनधिकृत बांधकामे पाडावी. मगच शेतकऱ्यांची अतिक्रमणे पाडावी.
- नारायण बोडके, अध्यक्ष, पवना धरणग्रस्त संयुक्त संघटना
धरण परिसरातील जागेवरील बेकायदेशीर बांधकामांना वरिष्ठांच्या आदेशानुसार नोटिसा दिल्या आहेत. अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अतिक्रमणे काढण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. सर्व अतिक्रमणे काढली जाणार आहे. धरणाच्या जागेवर अतिक्रमण करु नये. जागा घेताना ती कायदेशीर आहे अथवा नाही, याची खातरजमा करुनच बांधकामे करावी.
- माणिक शिंदे उपअभियंता, पवना धरण, पाटबंधारे विभाग
PVN25B02378
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.