पिंपरी-चिंचवड

वातावरण क्रीडामय

CD

पवनानगर ः पुणे ग्रॅंड टूर सायकल स्पर्धकांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गावागावातील नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. ढोल-ताशाच्या गजरात रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांचा कडकडाट संपूर्ण परिसरात आनंदी व क्रीडामय वातावरण निर्माण झाले. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना स्पर्धकांच्या स्वागताचे फलक झळकावले. जवण, तिकोना, ठाकूरसाई, ब्राम्हणोली, काले, पवनानगर, येळसे, कडधे, आर्डव, थुगाव,
मळवंडी ढोरे व शिवणे ग्रामपंचायतीच्या वतीने चौकाचौकात मंडप टाकण्यात आले होते. आरोग्य विभाग, महसूल विभाग व पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. स्पर्धेमुळे युवकांमध्ये सायकलिंग व आरोग्याबाबत सकारात्मक संदेश पोहोचत असून क्रीडासंस्कृतीला चालना मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेक ठिकाणी ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक-युवती आणि महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.
पुणे ग्रॅंड टूर सायकल स्पर्धा ही शिस्त, सहनशक्ती आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश देणारी असून गावोगावी झालेल्या या उत्स्फूर्त स्वागतामुळे स्पर्धकांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT