पिंपरी-चिंचवड

रावेतमध्ये रस्त्यावर कचरा, पालापाचोळा

CD

रावेत, ता. २५ : रावेत-औंध बीआरटी रोड आणि मुकाई चौक ते भक्ती-शक्ती मार्ग हा शहरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता आहे. मात्र या मार्गावर सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव दिसून येत असून नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. रस्त्यावर कचरा, झाडांचा पालापाचोळा आणि स्टीलच्या कुंड्यांमध्ये साचून राहिलेली घाण यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे.
पालिका प्रशासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्टीलच्या कचरा कुंड्या बसविल्या आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या कुंड्यांची साफसफाई न झाल्याने त्या ओसंडून वाहत आहेत. कचऱ्यात प्लास्टिक, अन्नकचरा, वाळलेली पाने, कागदाचे तुकडे यांचा मोठा ढीग असून त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. कचरा आणि पालापाचोळा साचून राहिल्याने माशा, कीटक वाढू लागले आहेत. यामुळे डेंग्यू, ताप असे आजार वाढण्याचा धोका आहे.

पादचाऱ्यांना अडथळा
औंध-रावेत बीआरटी मार्गावरील झाडांची छाटणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली. मात्र छाटलेल्या फांद्या, पाने व पालापाचोळा रस्त्याच्या कडेला ढिगाऱ्यांच्या स्वरूपात टाकून ठेवण्यात आला आहे. हा पालापाचोळा अद्याप उचलण्यात न आल्याने तो रस्त्यावर विखरल्याने पादचाऱ्यांना येथून जाताना अडथळा निर्माण होत आहे.


प्रमुख मागण्या
-कचरा कुंड्यांची दररोज सफाई करावी
-पालापाचोळा त्वरित उचलावा
-रस्त्यांची धूळ कमी करण्यासाठी पाणी फवारणी करावी
-बीआरटी मार्गावर नियमित स्वच्छता पथक नेमावे.


स्टीलच्या कुंड्या ठेवून काम संपले असे पालिकेला वाटते, पण त्या रिकाम्या केल्या जात नाहीत. कचरा वाऱ्याने रस्त्यावर पसरतो आणि संपूर्ण परिसरात अस्वच्छता निर्माण होते.
-स्नेहल पाटील, स्थानिक नागरिक

कचऱ्याचा वास इतका त्रासदायक असतो की दुकानात उभे रहायलाही कठीण होते. त्वरित सफाई मोहीम राबवली नाही तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल.
-सागर चौधरी, व्यावसायिक

पानगळ आणि छाटणी केलेला कचरा उचलला जात नाही. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. धुळीमुळे डोळ्यांना त्रास होतो.
-रोहित जाधव, स्थानिक नागरिक

रावेत आणि परिसरातील कचरा पेट्यांमध्ये साचलेला कचरा उचलला जात आहे. रस्त्याच्या कडेला साचलेला पाचोळा स्वच्छ करून घेण्यात येईल.
-अमित पिसे, आरोग्य निरीक्षक, ब प्रभाग महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

SCROLL FOR NEXT