पिंपरी-चिंचवड

कचरा वर्गीकरणाबाबत जागरूकता वाढावी काही भागांतच नियमित स्वच्छता

CD

रावेत

रावेत : परिसरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाचा दावा आणि प्रत्यक्ष स्थिती यात तफावत दिसते. काही भागांत रस्ते रोज झाडले जातात, तर अनेक वसाहतींमध्ये स्वच्छतेची वेळ अनियमित असल्याचे नागरिक सांगतात.
परिसरात घंटागाडी सकाळी सात ते साडेसातदरम्यान पोहोचते. परंतु, अनेकदा वेळ बदलल्याने नागरिकांना गोंधळ निर्माण होतो. कचरा वर्गीकरणाबाबत जागरूकता वाढली असली, तरी काही भागांत अजूनही मिश्र कचरा देण्यात येतो. घंटागाड्यांवर वर्गीकरण डबे असले, तरी त्याचा वापर अपुरा असल्याचे नागरिक सांगतात. तर, म्हस्के वस्ती, आदर्शनगर रस्ता, मुकाई चौक ते औंध बीआरटी मार्ग, रावेत चौक ते भोंडवे कॉर्नर रस्ता परिसरात कचरा उघड्यावर टाकला जातो. याबाबत चंद्रभागा कॉर्नर परिसरातील रहिवासी प्रीती कदम म्हणाल्या, ‘‘रस्त्यावर झाडलोट होत असली, तरी काही ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. रिकाम्या प्लॉटजवळ त्रास वाढतो. प्रशासनाने नियमित देखरेख करत दंड आकारावा.’’

नागरिकांची निरीक्षणे
- उच्चभ्रू वस्तीतील रस्ते स्वच्छ असतात
- भोंडवे वस्ती, तुपे वस्ती, रावेत गाव, बाजारपेठांचे क्षेत्र अस्वच्छ
- कचरा वर्गीकरण वाढण्याची अपेक्षा
- रस्त्यांवर व रिकाम्या प्लॉटमध्ये कचरा टाकणे कायम

भोंडवे कॉर्नर ते वाल्हेकरवाडी मार्गावर अनेक हॉटेल्स आहेत. त्यांचा ओला आणि सुका कचरा एकत्र रस्त्यावर टाकला जातो. परिसरात दुर्गंधी पसरते. स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था हवी आहे.
- अशोक दानावले, रहिवासी

घंटागाडीची वेळ ठरलेली असली, तरी ती रोज बदलते. आम्ही कचरा वर्गीकरण करून देण्याचा प्रयत्न करतो. पण, वाहनातील डबे कधी भरलेले असतात, कधी उपलब्ध नसतात.
- स्वाती जाधव, भोंडवे वस्ती
RVT25A00159

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cold Wave Warning Maharashtra : विदर्भात थंडीचा येलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज समोर, सतर्कतेचा इशारा

iPhone 15 झाला एकदम स्वस्त! 'या' ठिकाणी मिळतोय 28 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट

Latest Marathi News Update : विरोधी पक्षनेतेपदाबाबत अफवा, अफवांवर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे

Mumbai News: मुंबईच्या जलव्यवस्थापनाला बळ! सांडपाणी वाहतुकीसाठी नव्या ‘वॉटर टनेल'ला CRZ मंजुरी; कुठून कुठे असणार मार्ग?

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू, नागपूरहून गडचिरोलीला जाताना दुर्घटना

SCROLL FOR NEXT