पिंपरी-चिंचवड

आकुर्डी-प्राधिकरणात पेव्हिंग ब्लॉकचे काम रखडले

CD

रावेत, ता. १२ ः आकुर्डी-प्राधिकरण परिसरात आमदार फंडातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, गेल्या अनेक आठवड्यांपासून हे काम रखडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या कामासाठी जुने ब्लॉक काढून ठेवण्यात आले आहेत. परंतु नवे ब्लॉक बसविण्याचे काम अद्याप सुरू झाले नाही. परिणामी, पादचारी मार्ग खड्डेमय झाल्याने पादचाऱ्यांना अडथळे निर्माण होत आहेत.
परिसरातील पदपथावर जागोजागी माती, दगड आणि अवशेष पडल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. विशेषतः वृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना या तुटक व असुरक्षित पदपथामुळे धोका निर्माण झाला आहे. कामासाठी नवे ब्लॉक तर आणून ठेवले आहेत, पण महिनाभरापासून ठेकेदाराने एक फूटही काम पुढे सरकवलेले नाही. पादचारी मार्ग उद्ध्वस्त झाला असून रोज धोक्याचा सामना करावा लागतो. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांना अनेकवेळा माहिती दिली असूनही, प्रत्यक्ष दुरुस्ती किंवा स्वच्छतेचे कोणतेही नियोजन दिसत नाही. अपूर्ण पदपथामुळे काही ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे.

नागरिकांची मागणी
पेव्हिंग ब्लॉकचे काम तातडीने पूर्ण करावे
ठेकेदारांवर कारवाई करून कामाची गती वाढवावी

नवीन ब्लॉक आणून ठेवले आहेत, पण महिनाभर ठेकेदाराने कामाला हातही लावलेला नाही. अधिकारी आणि ठेकेदार फक्त काम सुरू होईल असे सांगत राहतात. प्रत्यक्षात काहीच होत नाही. या अपूर्ण कामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे.
-प्रवीण सावंत, स्थानिक नागरिक


संध्याकाळी मुलांना घेऊन चालणे अवघड झाले आहे. ठिकठिकाणी खड्डे, दगड आणि तुटके ब्लॉक पडले आहेत. थोडी चूक झाली तरी पडण्याचा धोका आहे. इतके दिवस झाले तरी काम का पूर्ण होत नाही, हा प्रश्न कायम आहे.
-नीलम पाटील, स्थानिक नागरिक

वय झाल्यामुळे चालण्यात स्थिरता आवश्यक असते. पण या तुटक्या पदपथावरून चालणे म्हणजे जणू एखाद्या अडथळ्यांच्या शर्यतीसारखे आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अजिबात सोयिस्कर नाही. काम रखडण्यामागची कारणे प्रशासनाने स्पष्ट करावीत.
-राकेश भुजबळ, ज्येष्ठ नागरिक

हे काम आमदार फंडातून सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काम होत आहे. लवकरच काम पूर्ण होईल.
-मीनल डोडल, सहाय्यक अभियंता, अ प्रभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT