पिंपरी-चिंचवड

विकासाच्या घोषणांचा पाऊस, मात्र अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचा ‘पूर’

CD

रावेत, ता. ५ : शहराचा महत्वाचा भाग म्हणून विकसित होणाऱ्या रावेत आणि आकुर्डी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत वाईट झाली आहे. लोकप्रतिनिधींकडून विकासाचे मोठे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना खड्डे आणि सांडपाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. अंतर्गत रस्ते मृत्यूचा सापळा ठरू लागले आहेत. रहिवाशांचा जीव धुळीमुळे कोंडला जात आहे.
रावेत परिसरातील दळणवळणाचे महत्त्वाचे दुवे असलेले अंतर्गत रस्ते सध्या अत्यंत बिकट स्थितीत आहेत. काही ठिकाणी विकास कामे संथगतीने सुरू असल्यानेही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. भोंडवे वस्ती बसस्थानकाजवळ तर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. येथे वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था गंभीर आहे. भोंडवे वस्ती ते तुपे वस्ती जोड रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना दररोज दुर्गंधी आणि चिखलाचा सामना करावा लागत आहे. हीच स्थिती तुपे वस्ती रस्त्याची असून या परिसरातील अंतर्गत रस्ते अरुंद आणि खड्ड्यांनी भरलेले असल्याने चालणेही कठीण झाले आहे. म्हस्के चौक ते एस.बी.पाटील महाविद्यालय मार्गे शिंदे वस्ती जोड रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असूनही रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे येथे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.
रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न गंभीर होत आहे. श्वसनाचे विकार जडत आहेत. तसेच सांडपाण्याच्या डबक्यांमुळे परिसरात डेंगी, हिवताप (मलेरिया) यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या घाणीतूनच रोज ये-जा करावी लागत आहे.

लोकप्रतिनिधींवर रोष
कातळे वस्तीला व इतर वस्त्यांना जोडणारे अंतर्गत रस्त्यांचे आजही डांबरीकरण झालेले नाही. पावसाळ्यानंतर रस्त्यांची अवस्था वाईट झाली असून वाहनचालक व पादचारी रोज अपघाताच्या धोक्यातून प्रवास करत आहेत. रुग्णवाहिकांनाही या खराब रस्त्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर केला जात आहे.

काही खराब अंतर्गत रस्ते
- समीर लॉन्स ते किवळे गाव
- भोंडवे वस्ती ते तुपे वस्ती
- प्राधिकरणापासून ते शिंदे वस्ती
- प्राधिकरण परिसर
- आकुर्डी रेल्वे स्थानक ते भोंडवे कॉर्नर
- रावेत पंपिंग स्टेशन ते मुकाई चौक
- किवळे गाव ते रावेत गाव

गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्या घरासमोरील रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे. तक्रारी करूनही महापालिका प्रशासन केवळ वरवरची सफाई करून निघून जाते. आता तर हे दूषित पाणी घरांच्या पायात शिरू लागले आहे. पादचारी आणि दुचाकीस्वारांना चिखलामुळे कसरत करावी लागते. आमच्या आरोग्याशी हा थेट खेळ सुरू आहे.
- अनिकेत रेगुडे, रहिवासी

एस. बी. पाटील महाविद्यालय रस्ता ते शिंदे वस्ती रस्त्यावर खड्डे आहेत. मुलांना सायकल चालविण्यास देतानाही भीती वाटते. अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीकडे महानगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. आम्ही नियमित कर भरतो, मग आम्हाला किमान चालण्यायोग्य रस्तेही का मिळत नाहीत ?
- अश्विनी कुलकर्णी, रहिवासी


समीर लॉन्स ते किवळे गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले होते. या रस्त्यावरून बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांची वाहतूक होते. जड वाहनांच्या रहदारीने काही ठिकाणी खड्डे पडले असतील, ते निवडणुका झाल्या की पूर्ण केले जातील.
- स्वप्नील शिर्के, सहाय्यक अभियंता ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
PNE26V82806

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात तडीपार माजी आमदार भाजप उमेदवाराच्या प्रचारात; काँग्रेस नेत्यानं CCTV फूटेज दाखवत केले आरोप

ZP Election : झेडपी निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार; १२ जिल्ह्यांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

Simple Home Remedies: रोज रात्री जेवणानंतर पोट फुगतंय? सतत गॅसचा त्रास होतोय? आजपासून करा 'हे' सोपे उपाय

Nashik Accident : चाचडगाव टोलनाक्याजवळ भीषण दुर्घटना; ईर्टिगा-स्कॉर्पिओच्या धडकेत गुजरातच्या कुटुंबावर काळाचा घाला

AI Toys Ban : लहान मुलांचे 'बोलके खेळणे' ठरू शकते खतरनाक! सरकारने घेतली मोठी अ‍ॅक्शन; काय मार्केटमधून गायब होतील सगळे गॅजेट्स?

SCROLL FOR NEXT