पिंपरी-चिंचवड

रावेत परिसरातील अनेक पथदिवे बंद

CD

रावेत, ता. ९ : रावेत परिसरातील म्हस्के वस्ती ते मुकाई चौक या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील अनेक पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा परिसर अंधारात बुडालेला असतो. परिणामी वाहनचालक, पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
हा मार्ग रावेत, किवळे, आकुर्डी व मुंबई-पुणे महामार्गाकडे जाण्यासाठी महत्त्वाचा आहे. तेथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. रात्री पथदिवे बंद असल्याने खड्डे, गतिरोधक, वाहिन्यांवरील उघडी झाकणे आणि बांधकामामुळे पडलेला राडारोडा दिसत नाही. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक रहिवासी शरद आव्हाळे यांनी सांगितले की, ‘दररोज रात्री कामावरून परतताना भीती वाटते. रस्ता दिसत नाही. खड्डा कुठे आहे हे कळत नाही. लहान मुले आणि महिला या मार्गावरून जाणे टाळत आहेत.’
पादचाऱ्यांसाठीही ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. सोसायटीतून बाहेर पडून मुकाई चौकात जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांनी या संदर्भात महापालिकेकडे आणि विद्युत विभागाकडे पथदिवे त्वरित सुरू करण्यासाठी मागणी केली आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : मोठी बातमी! भारतीय तेल जहाजे अडकलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचा हल्ला; अनेक इराणी जहाजे नष्ट!

Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला गर्भाशयाची पिशवी फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, प्रियकराला अटक

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये LPG चा मोठा तुडवडा

‘तुमच्या पोरीचं ५० वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं!’ विशालसोबतच्या चर्चेमुळे रुचिताच्या घरच्यांना त्रास; म्हणाली, ‘पप्पा खूप रडले आणि...’

Kolhapur Water Tax Hike : कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार

SCROLL FOR NEXT