पिंपरी-चिंचवड

रावेत यात्रेनिमित्त भव्य कुस्ती आखाडा रंगला

CD

रावेत, ता. २२ : ग्रामदैवत धर्मनाथ महाराज यात्रेनिमित्त रावेत गावात पारंपरिक कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले. या आखाड्यात तब्बल १०० कुस्त्या रंगल्या असून सुमारे २०० मल्लांनी आपले डावपेच दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. परिसरातील गावाच्या कुस्तीपटूंनी सहभाग घेतल्याने आखाड्याला जिल्हास्तरीय स्वरूप प्राप्त झाले.
पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मल्लांचे स्वागत करण्यात आले.
यात्रेतील इतर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांसह कुस्ती आखाड्यामुळे उत्सवाला वेगळीच रंगत आली. त्यामुळे नागरिकांनी या आयोजनाचे कौतुक केले. उत्सव समितीचे सचिव रामभाऊ भोंडवे, प्रल्हाद भोंडवे, नंदकुमार भोंडवे, दिवाण भोंडवे, दीपक भोंडवे, मोरेश्वर भोंडवे, गणेश भोंडवे यांनी परिश्रम घेतले.

शेवटच्या कुस्तीसाठी ५१ हजारांचा इनाम व चांदीची गदा
अखेरची कुस्ती विशेष आकर्षण ठरली. या कुस्तीसाठी विजेत्या मल्लाला ५१ हजार रुपये रोख रक्कम आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. एकूण आखाड्यात सुमारे चार लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

विविध गावांतील मल्लांचा सहभाग
रावेतसह पिंपरी-चिंचवड परिसर, पुणे ग्रामीण तसेच शेजारील तालुक्यांतील मल्लांनी आखाड्यात हजेरी लावली होती. अनुभवी पैलवानांबरोबरच तरुण मल्लांनीही जोरदार लढती सादर केल्या.

परंपरेचे जतन आणि उत्सवाचे रंग
धर्मनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी आयोजित होणाऱ्या या कुस्ती आखाड्यामुळे पारंपरिक खेळांना चालना मिळते, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. तरुण पिढीला कुस्तीची आवड निर्माण व्हावी आणि आपली सांस्कृतिक परंपरा जपली जावी, या उद्देशाने हा आखाडा आयोजित केला जातो, अशी प्रतिक्रिया आयोजकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT