पिंपरी-चिंचवड

संचय कथक नृत्य अकादमीचे शास्त्रीय नृत्य, संगीत परीक्षेत यश

CD

रावेत, ता. २८ : येथील संचय कथक नृत्य अकादमीने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय नृत्य आणि संगीत परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले. अकादमीच्या सर्व विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणी आणि विशेष प्रावीण्य मिळवून यशाची परंपरा कायम राखली आहे.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अधिकृत केंद्र असलेल्या या अकादमीतून विविध स्तरांवरील परीक्षांमध्ये विद्यार्थिनींनी उत्तम गुण मिळवले आहेत. या यशात अकादमीची विद्यार्थिनी मृदुला टोणगावकर हिने विशेष ठसा उमटविला. तिने विशारद प्रथम परीक्षेत चिंचवड केंद्रातून क्रियात्मक (प्रात्यक्षिक) परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला. अकादमीच्या संचालिका वैशाली धोंगडे आणि राजश्री धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी हे यश मिळविले.
अन्य यशस्वी विद्यार्थिनी - प्रारंभिक परीक्षा : भाग्यदा वैद्य, साची बंग, अश्विनी देशपांडे, अनिका खरे, मुद्रा कवठेकर, रमा इनामदार, वेदिका भोकरे, मायरा खडका आणि मानवी शेट्टी.
प्रवेशिका प्रथम परीक्षा : निर्विष्का बोरसे, मृण्मयी देशमुख, मानसी देशमुख, पियुषा देवहते आणि शिवानी गोसावी.
प्रवेशिका पूर्ण परीक्षा : साक्षी भंगाळे, गौतमी कुलकर्णी, हिमानी पुराणिक, साई पाटील आणि अवनी जोशी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma Health Update: अभिषेक संघासोबत स्टेडियममध्ये दिसला, पण का नाही खेळला? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांची पुण्यासाठी पहिलीच डीपीसी बैठक; १ हजार ३२ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का हे पाहावे लागेल - संदीप देशपांडे

जिनिलियाला पहिल्यांदा घरात पाहिल्यावर काय होती विलासराव देशमुखांची प्रतिक्रिया? रितेशने सांगितला तो प्रसंग

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

SCROLL FOR NEXT