पिंपरी-चिंचवड

महामार्गाच्या सेवा रस्त्यांवर धुळीचे लोट

CD

रावेत, ता. १० : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील रावेत येथील धर्मनाथ महाराज पुलाखालील रस्ता, दोन्ही बाजूचे सेवा रस्ते आणि महामार्ग परिसरात अवजड वाहनांची रहदारीमुळे धुळीचे प्रमाण वाढले असून त्याने नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना श्वसनविकार, अ‍ॅलर्जी, डोळ्यांची जळजळ, तसेच घशाचे आजार उद्‍भवत आहेत.
धर्मनाथ महाराज उड्डाणपुलाखालील रस्ता आणि लगतच्या सेवा रस्त्यांवरून दररोज मोठ्या संख्येने अवजड वाहने, ट्रक, कंटेनर, डंपर व मालवाहू वाहने जात असल्याने सतत धूळ उडत आहे. या मार्गाचा वापर स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि पादचारी रोज करतात. मात्र, रस्त्यावरील असमानता, खड्डे, विनाडांबरीकरणाचा कच्चा रस्ता आणि सतत वाहतुकीचा भार यामुळे हा मार्ग धुळीचा पट्टा बनला आहे. सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी तर परिस्थिती अधिकच बिकट होते.

दुकाने, घरांवर धुळीचे थर
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी धूळ साचल्यामुळे परिसरातील दुकाने, घरे, आणि वाहनांवर सतत धुळीचा थर बसतो. या समस्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


भुयारी मार्ग आणि जवळील सेवा रस्त्याची दुरवस्था प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य असून धुळीच्या त्रासावर त्वरित उपाययोजना कराव्यात.
- सोपान कोरडे, स्थानिक नागरिक


धूळ सदृश्य वातावरणात दीर्घकाळ राहिल्यास फुफ्फुसांचे आजार, दमा, अ‍ॅलर्जी आणि मुलांमधील श्वसनविकार वाढण्याचा धोका असतो. विशेषतः लहान मुलांमध्ये याचे परिणाम लवकर दिसतात. त्यामुळे रस्त्यावर नियमित पाण्याची फवारणी करणे, डांबरीकरण करणे व वाहतुकीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
- डॉ.दीपेश अग्रवाल, आरोग्यविषयक तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT