पिंपरी-चिंचवड

भोंडवे बाग चौकात सिग्नलची मागणी

CD

रावेत, ता. १३ : येथील रावेत-औंध बीआरटी मार्गावरून भोंडवे बागकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ असून, वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे येथे तातडीने ट्रॅफिक सिग्नल किंवा स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या रस्त्यावरून दिवसभर दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. शाळकरी मुले, खासगी शिकवणीला जाणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना त्रास सहन करावा लागतो. वाहनांचा वेग जास्त असल्याने पादचाऱ्यांसाठी परिस्थिती धोकादायक बनली आहे. नुकतेच एका विद्यार्थिनीचा अपघात झाल्याची घटना घडली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून सिग्नल किंवा गतिरोधक बसवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

‘‘रस्त्यावरून वाहने अक्षरशः वेगाने धावतात. सिग्नल किंवा गतिरोधक नसल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो.’’
- अमोल जगताप, स्थानिक रहिवासी

‘‘दररोज खासगी शिकवणीला जाताना भीती वाटते. अपघात झाल्यानंतर तरी प्रशासनाने लक्ष द्यावे.’’
- पूजा शिंदे, विद्यार्थिनी

‘‘येथे सिग्नल किंवा गतिरोधक बसवला तर वाहतुकीवर नियंत्रण राहील आणि अपघात टळतील. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.
- सचिन कदम, स्थानिक नागरिक
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT