पिंपरी-चिंचवड

पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी

CD

रावेत, ता. २६ : पुणे आणि लोणावळा या दोन शहरांना जोडणाऱ्या तसेच लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेबाबत प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गावर एकही लोकल उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या काळात नवीन फेऱ्या सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी ११:२० च्या सुमारास सुटणाऱ्या लोकलनंतर थेट दुपारी ३:०० वाजता पुढील लोकल उपलब्ध आहे. हा सुमारे चार तासांचा खंड प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. पिंपरी-चिंचवड, तळेगाव, कामशेत आणि लोणावळा या भागातील प्रवाशांना पुणे शहरात कामासाठी किंवा उपचारासाठी आल्यानंतर परत जाण्यासाठी स्वस्त आणि वेगवान पर्याय राहत नाही.
या भागातील विविध महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दुपारी लवकर सुटी मिळाल्यास त्यांना स्टेशनवर तासनतास ताटकळत बसावे लागते. तसेच नोकरदार व छोटे व्यावसायिक ज्यांचे कामाचे तास दुपारी संपतात किंवा ज्यांना तातडीने लोणावळ्याच्या दिशेने जायचे असते, त्यांना एसटी बस किंवा खासगी वाहनांचा महागडा प्रवास करावा लागतो. लोणावळ्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. दुपारी रेल्वे नसल्याने पर्यटकांचे नियोजन विस्कळीत होते. या भागातील रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना दुपारी घरी परतताना रेल्वे नसल्याने स्थानकावरच विश्रांती घ्यावी लागते.
पुणे-लोणावळा रेल्वे प्रवासी संघ आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. रेल्वेने या चार तासाच्या खंडात किमान दुपारी एक ते दीड च्या दरम्यान एक अतिरिक्त लोकल फेरी सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.


लोकल नसल्यामुळे आम्हाला बसने प्रवास करावा लागतो, त्यामुळे रेल्वेच्या तुलनेत पाचपट जास्त पैसे मोजावे लागतात आणि वाहतूक कोंडीमुळे वेळही वाया जातो. रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहावे.
- उमेश बडगुजर, नियमित प्रवासी रावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT