पिंपरी-चिंचवड

भटक्या श्वानांची आकुर्डीमध्ये दहशत

CD

आकुर्डी, ता.३ : दत्तवाडी, आकुर्डी परिसरात मोकाट आणि पिसाळलेल्या श्वानांची दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एका आक्रमक श्वानाने सात ते आठ नागरिकांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना हातात काठ्या घेऊन बाहेर पडावे लागत आहे.
आकुर्डी, दत्तवाडी परिसरातील शाळकरी मुलांना आणि सकाळ-संध्याकाळ फिरायला जाणाऱ्या नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने पथक पाठवून आक्रमक श्वानाला पकडावे. तसेच परिसरातील भटक्या श्वानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी लेखी अर्ज दिला आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आकुर्डी, दत्तवाडी परिसरात भटक्या आणि पिसाळलेल्या श्वानांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत सात ते आठ जणांना चावा घेतला असून काहींना रुग्णालयात जाऊन लसीकरण करावे लागले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेष धोका निर्माण झाला आहे.
- गिरीश पाटील, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजित दीपके यांनी सांगितली तारीख, दिला मोठा इशारा

पुणे मिरज मार्गावर २१ दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले, प्रवाशांचे हाल

रिल्समध्ये प्रामाणिकपणाचा आव, कारवाई टाळण्यासाठी मासिक हप्त्याची मागणी; ६ लाख घेताना तहसीलदाराला अटक; कोण आहे विजय चव्हाण?

Latest Marathi News Live Update : युद्धाच्या परिणामामुळे इंधन दरात वाढ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज; रात्रीच्या गस्तीला विशेष महत्त्व, चोवीस तास वॉचमन तैनात

SCROLL FOR NEXT