रावेत, ता.२३ : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या रावेत येथील सेवा रस्त्याचे काम रखडल्याने रहिवासी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्ता खोदून ठेवला आहे. मात्र, प्रत्यक्ष काम बंद असल्याने हा मार्ग आता अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून रावेत भागात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी हा सेवा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी किंवा दुरुस्तीसाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून येथे एकही कामगार किंवा यंत्रणा दिसत नाही. अर्धवट खोदलेल्या रस्त्यामुळे येथील रहदारी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
रस्ता कच्चा आणि खोदून ठेवलेला असल्याने येथून वाहन गेल्यावर धुळीचे प्रचंड लोट हवेत पसरतात. त्याने गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांना खिडक्या उघडणेही कठीण झाले आहे. तसेच रस्त्याकडेला असलेले हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या दुकानदारांच्या मालावर धुळीचा थर साचत असल्याने त्यांच्या व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुभाष घंटे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता खोदून ठेवला आहे, पण पुढे काहीच हालचाल नाही. रात्रीच्यावेळी तर येथे भीषण परिस्थिती असते. पथदिवे कमी आणि त्यात अर्धवट खोदलेला रस्ता यामुळे रोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत.
- प्रणव काळभोर, स्थानिक रहिवासी, रावेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.