पिंपरी-चिंचवड

पोषण आहारासाठी स्वकष्टामधून विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग

CD

बी.आर.पाटील- सकाळ वृत्तसेवा

शिरगाव, ता १६ : विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा आणि त्या शाळेनेच पिकविलेल्या भाज्या असाव्यात या हेतूने चंदनवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आपल्या शाळेच्या छतावर विद्यार्थी, शिक्षकांच्या सहकार्याने परसबाग तयार केली असून त्यामध्ये कुंड्यांच्या आधारे विविध फळभाज्या, पालेभाज्यांची लागवड केली आहे.
चंदनवाडी ही शाळा ग्रामीण भागात असल्याने शाळेभोवती फुलझाडे, फळझाडे आणि विविध प्रकारची सावली देणारी झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. शाळेच्या मागे काही आणि छतावर काही भाज्या आणि फळभाज्या लावल्या; तर विद्यार्थ्यांना पोषण आहारात द्यायला होतील, या संकल्पनेने शाळेच्या छतावर शिक्षकांनी प्लास्टिक कागदाचे आच्छादन करून माती भरण केले. जुलै महिन्यामध्ये परसबागेची पूर्व मशागत करून घेवडा, वाल, उडीद याची लागवड करण्यात आली. शाळेच्या संरक्षण भिंतीच्याकडेनेही भाजीपाल्याची लागवड करण्यात आली. त्याला शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या रेखा पारधे, अस्मिता सप्रे, रेश्मा मधे यांचे सहकार्य लाभत आहे. सरपंच मीना माळी, सदस्य दादा केदारी, उर्मिला गावडे, सागर गायकवाड व ग्रामस्थांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. विस्तार अधिकारी शोभा वहिले, निर्मला काळे, बेबडओहळ केंद्राच्या केंद्रप्रमुख सविता शिंदे, दारुंब्रे केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक मिसाळ यांनीही या शाळेला भेट देवून या उपक्रमाची पाहणी केली.

कुंड्या अन् मोकळ्या जागेतही भाज्या
शाळेच्या मोकळ्या जागेत व कुंड्यांमध्ये काही पालेभाज्या लावल्या आहेत. त्यामध्ये, प्रामुख्याने वेलवर्गीय भोपळा, दोडका, कारले, डांगर, चवळी, वाल तर फळवर्गीय कोबी, पपई, डाळिंब, आवळा, कढीपत्ता, पालक, वांगी, बीट, टोमॅटो, मिरची, पालेभाज्यात कोथिंबीर, आळू यांची लागवड करण्यात आली आहे.
याशिवाय, औषधी वनस्पतींमध्ये कोरफड, दगडी पाला, लाजाळू, तुळस, गवती चहा इत्यादींचा समावेश आहे. शिक्षिका अर्चना शिरसाट, सुनीता गावडे आणि विद्यार्थ्यांकडून त्यांची देखभाल केली जात आहे.


सध्या कुंड्यांत लावलेल्या फळभाज्या तोडणीस आल्याने काही भाज्यांची काढणी करण्यात आली आहे. त्यात पालक दहा गड्डी, दोडका तीन ते चार किलो, बिन्स सात किलो, वांगी ५ किलो, बीट ५ किलो, कारले ५ किलो निघाले आहे. आणखी तोडणी बाकी आहे. स्वतः पिकवलेले पदार्थ जेवणात आल्यावर जो आनंद होतो. त्यापेक्षा मोठे समाधान नाही आणि हे समाधान मी मुलांच्या चेहऱ्यावर पहिले.
- विकास रासकर, मुख्याध्यापक, चंदनवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक आणि सर्वच शिक्षक यांचे कौतुक आहे. कारण, या नुसत्या भाज्या नाहीत; तर मुलांनी पिकविलेल्या भाज्या आहेत. त्यामुळे मुलांना स्वकष्टाची जाणीव होते. शेतकऱ्यांना अन्नदाता म्हटले जाते, याचे उत्तर त्यांना आपोआप मिळते.
- अशोक मिसाळ, केंद्र प्रमुख, दारुंब्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: संजय शिरसाट यांच्यावर पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप; 'एसीबी'नेच माहिती लीक केल्याचा तक्रारदाराला संशय

Gold Silver Rate India : शेअर बाजार ओपन होताच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जानेवारी २०२७ पर्यंत सोने एक लाखांच्या आत येणार?

IPL 2027 Auction Player Register List: १२२० खेळाडूंनी नोंदवली नावं... त्यात १२ बांगलादेशी; भारताचे दोनच खेळाडू २ कोटींच्या यादीत, कोण आहे ते?

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, ६ प्रवासी जखमी

Farmer ID Registration : शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी नसेल तर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही? मोबाईलवरून असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT