शिरगाव, ता. ९ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सोमाटणे गट आणि चांदखेड, सोमाटणे या गणांत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत भाजप उमेदवारांचा उमेदवारांचा पराभव केला. एकीकडे या विजयाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी अजित पवार यांच्या निधनाने वातावरण भावूक झाल्याचे दिसून आले.
सोमाटणे गटात ऐनवेळी म्हणजे अर्ज भरायच्या काही तास आधी उमेदवार घोषित करणे भाजपला महागात पडले. शिवाय प्रचारात घेतलेली पिछाडी ही शेवटपर्यंत तशीच राहिली. त्यामुळे विजयाची माळ भाजपपासून दूर राहिली. शिवाय गेली चार वर्षे पदरमोड करत नियोजन करणाऱ्या विजयी उमेदवार मनीषा मुऱ्हे यांचे पती नितीन मुऱ्हे यांनी उराशी बाळगलेले स्वप्न आणि सुनील शेळके यांनी केलेला सर्वच स्तरातील विकास यामुळे सत्यात उतरले. गेले चार वर्ष मुऱ्हे हे कोणत्या ना कोणत्या रूपाने गटातील लोकांच्या संपर्कात होते त्याचा फायदा त्याना आत्ता झाला. निवडणूक जवळ आल्यावर बऱ्याच घडोमोडी घडूनही शेवटी मुऱ्हे हे तिकीट मिळवण्यात यशस्वी झाले आणि येथेच त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यांनी सुमारे १३ हजार मतांनी विरोधी उमेदवार गराडे यांचा पराभव करत विजय साकार केला.
या निकालामुळे उमेदवारांसाहित गणात आणि गटात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमाटणे गटात मनीषा नितीन मुऱ्हे यांनी विजय मिळवला. तर, गणात माजी सदस्य साहेबराव कारके यांनी अडीच हजारांपेक्षा जास्त आघाडी घेत विजयी घौडदौड या निवडणुकीतही कायम ठेवली आहे.
चांदखेड गणात सुनीता येवले यांनी भाजपच्या घोटकुले यांचा जवळपास अडीच हजार मतांनी पराभव करत पहिल्यांदा पंचायत समितीत प्रवेश केला आहे. आजच्या या निकालामुळे पवन मावळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. या तिन्ही गण आणि गटात मतदारांनी पाहुणे, नातेवाईक, आपला-परका अशा मुद्द्यांना थारा न देता मतदान केल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.