पिंपरी-चिंचवड

प्रतिशिर्डी शिरगाव श्री साईबाबा पालखीचे जल्लोषात स्वागत

CD

शिरगाव, ता. २१ : शिरगाव येथील साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, यांच्या वतीने आयोजित पुणे ते प्रतिशिर्डी शिरगाव साईबाबा पालखी सोहळ्याचे रविवारी (ता. १८) सायंकाळी शिरगाव येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातून निघालेल्या पालखीचे व साईबाबांच्या पादुकांचे भक्तानी दर्शन घेतले.
पालखी सोहळ्याची सुरुवात सकाळी ७ वाजता तोफखाना येथील रासने मंदिरात साईबाबांच्या पादुकांच्या महाअभिषेकाने झाली. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाअभिषेक व महाआरती झाल्याची माहिती विश्वस्त रवी जाधव यांनी दिली. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माजी आमदार अश्विनी जगताप, कृष्णकुमार गोयल आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालखी मिरवणुकीत आकर्षक पालखी रथ, ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. साईबाबांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
ही मिरवणूक बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता, अलका टॉकीज, संभाजी पूल, फर्ग्युसन रस्ता, ज्ञानेश्वर पादुका चौक, वडारवाडी, ओम सुपर मार्केट आणि सिंबायोसिस कॉलेज परिसरातून मार्गस्थ झाली. सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एस. बी. मुजुमदार, कुलगुरू स्वाती मुजुमदार, विद्या येरवडेकर आणि आमोद मुजुमदार व त्यांच्या परिवाराच्या हस्ते मध्यान्ह आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी सिंबायोसिस तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यानंतर पालखी प्रतिशिर्डी शिरगावच्या दिशेने रवाना झाली. पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी मंदिराचे व्यवस्थापक अनिल देवकर, जयेश मुळे, विष्णू कदम, सिद्धू माने आदींनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

Das, Ranka News: CJP च्या सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; तब्बल ७ दिवस तिहारमध्ये राहिल्यानंतर...

Uday Samant : एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांची चौकशी व्हावी

Latest Marathi News Live Update : शिळे अन्न खाल्याने तेरा जणांना विषबाधा; तिघांवर उपचार सुरू

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

SCROLL FOR NEXT