काळेवाडी, ता. ६ : काळेवाडी, रहाटणी परिसरात कायद्याने बंदी घालण्यात आलेला गुटखा, पान मसाल्याची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असून ते अगदी सहजतेने मिळत आहे. विविध ठिकाणी लपून छपून गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले असून गुटखा मिळतो; त्या ठिकाणी या गोष्टींना चक्क ‘खवा’, ‘चॉकलेट’, ‘मसाला’ यासारखी सांकेतिक नावे देण्यात आली आहेत. त्या नावांनी गुटखा मागितल्यास तत्सम वस्तू मिळत असून त्यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
वाकड, सांगवी व पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व तीन महापालिका क्षेत्रीय कार्यालयाची हद्द असणाऱ्या काळेवाडी परिसरात विविध ठिकाणी गुटखा मिळत आहे. रात्रीच्यावेळीही अंधाराचा फायदा घेऊन विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. सामान्य माणसाला जे दिसत आहे; ते या ठिकाणी गस्त घालणाऱ्या पोलिस मार्शल यांना कसे दिसत नाही ? याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काळेवाडी भागात रहाटणी फाटा, थेरगाव, तापकीर चौक, नवीन बीआरटीएस रस्ता, भारत माता चौक भागांत विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या दुकानांत; तर काळेवाडी भागात रहाटणी, धनगर बाबा, तापकीर चौक, पाचपीर चौक आदी परिसरात कोणालाही माहिती होणार नाही, अशा पद्धतीने ठराविक व नेहमीच्या ग्राहकांना गुटखा पुरविण्याचा व पैसे कमावण्याचा सोपा मार्ग शोधून काढला जात आहे.
ठाण्यापासून जवळच विक्री
ठराविक व नेहमीच्या ग्राहकांना गुटखा दिल्याने विक्री करणारे उजेडात येत नसून पोलिस प्रशासनाला हातावर तुरी देत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पोलिस येण्याअगोदर सर्व प्रकारची काळजी घेतली जाते; तर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर दिवसाढवळ्या गुटखा मिळत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अगरबत्ती, फुले देण्याचे बहाणे
सकाळी लवकर दुचाकीवरून अगरबत्ती, फुले देण्याच्या बहाण्याने काही गुटखा पुरवठा करणारे सामान्य नागरिकांच्या व पोलिस प्रशासनाच्या डोळ्यांत धूळ फेकून व इतर मार्ग अवलंबून गुटख्याचा पुरवठा करत आहेत. त्यामागे परराज्यांतील काही लोक असून ते छुप्या पद्धतीने गुटखा आणून विकत असल्याचे दिसून येत आहे.
काळेवाडी, रहाटणी परिसरात गुटखा विक्री व त्या संदर्भात कारवाई वेळोवेळी सुरू असून त्याविषयी खटले भरले जात आहेत. अशा गोष्टी व गुन्हे होणार नाही यासाठी प्रयत्नशील असून ठाण्याच्या कार्यकक्षेत लक्ष ठेवले जात आहे. असे प्रकार आढळून आल्यास संपर्क साधावा
- राजेंद्र बहिरट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेवाडी पोलिस ठाणे
काळेवाडी परिसरात छुप्या पद्धतीने व बाहेरील राज्यातून मागवण्यात येणारा बंदी असलेला गुटखा सहज मिळत असून पानाचे ठेले, टपऱ्याच नाही; तर काही किराणा दुकानांपासून अनेक सहभागी आहेत. खाणाऱ्यांना खास भाषेत गुटखा उपलब्ध व्हावा यादृष्टीने कामे केली जात आहेत. पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी.
- सिद्धार्थ गायकवाड, रहिवासी
सहज मिळणारा गुटखा व इतर खाणाऱ्यांना कसा काय सहज मिळतो ? पण पोलिस यंत्रणा त्याचा तपास करण्यासाठी प्रयत्न केल्याचे किंवा बिमोड करत नाही. याचे आश्चर्य आहे.
- किरण पिंगळे, व्यावसायिक
PNE25V29234
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.