पिंपरी-चिंचवड

काळेवाडी, रहाटणीवासीयांना गैरसोयीचा ‘धक्का’

CD

काळेवाडी, ता. १९ : काळेवाडी, रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी सोयीचे महावितरण कार्यालय चिंचवडच्या बिजलीनगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. यापूर्वी थेरगाव आणि चिंचवडच्या काकडे पार्क परिसरात हे कार्यालय चालू होते. काही काळानंतर ते पुन्हा चिंचवडमधील लिंकरोडला हलविण्याचे प्रस्तावित आहे. कार्यालयाचे वारंवार स्थलांतर आणि सध्याच्या बिजलीनगर येथील कार्यालयात जाणे-येणे गैरसोयीचे ठरत असल्याने काळेवाडी, रहाटणीमधील नागरिक त्रस्त झाले आहेत.
काळेवाडी, रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी तीन वर्षे थेरगाव येथील स्विस काउंटी सोसायटीतील एका कोपऱ्यात महावितरणचे कार्यालय सुरू होते. त्यासाठी मागील भागात सोसायटीने कार्यालयाला जागा दिली होती. यापूर्वी चिंचवड येथील काकडे पार्क परिसरात हे कार्यालय होते. नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून ते थेरगावात स्थलांतरित करण्यात आले. मात्र, मुख्य परिसरापासून लांब व सोसायटीच्या अतिशय आतील भागात व एका कोपऱ्यात गोदामासारख्या जागेत हे कार्यालय होते. तेथे पोहोचणे खास करुन ज्येष्ठ नागरिक व महिलांना येण्या-जाण्यासाठी गैरसोयीचे व मुख्य रस्त्यापासून आत असल्याने डोकेदुखी ठरत होते.
परंतु, आता हेच कार्यालय पुन्हा अजून सुमारे ६ ते ७ किलोमीटर पुढे नेत बिजलीनगर येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या अंतर्गत भागात नेण्यात आले आहे. त्यामुळे, काळेवाडी, रहाटणीमधील नागरिकांची ससेहोलपट होत आहे.
महावितरण कंपनीशी संबंधित दररोजच्या तक्रारी व सेवा यादृष्टीने बिजलीनगर येथील नवीन कार्यालयाशी संपर्क साधणे त्रासदायक व वेळखाऊ ठरु पाहत आहे.

सूचना फलकाचा अभाव
महावितरणच्या कार्यालयाचे स्थलांतर झाले असले तरी त्याविषयी सूचना फलकही सोसायटीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला नाही. साध्या पेन्सिलीने कार्यालयाच्या लोखंडी दारावर सूचना लिहिण्यात आली आहे. ती नागरिकांना दिसून येत नाही. शिवाय समजण्यासही त्रासदायक ठरत आहे. एखादा दिवस वीज बिल उशिराने भरल्यास ते भरण्यासाठी महावितरणकडून त्याच्या भरण्याचा तगादा लावला जातो. त्याचप्रमाणे महावितरणने सोयीची, कार्यक्षम आणि तत्काळ सेवा द्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. महावितरणचे कार्यालय मुख्यत्वे नागरिकांच्या सोयीसाठी आहे की कर्मचाऱ्यांच्या ? हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून त्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

पैसा,वेळ आणि इंधनाचा अपव्यय...
बिजलीनगर येथील कार्यालयामुळे काळेवाडी, रहाटणी परिसरातील नागरिकांच्या वेळ, पेट्रोल तसेच पैशांचा अपव्यय होणार आहे. छोट्या, मोठ्या तक्रारी व महत्त्वाच्या दस्तावेजासाठी मोठे अंतर पार करून कार्यालयाच्या वेळेत पोहोचणे व कार्यालयातील काम करुन घेणे जिकरीचे व मनस्ताप देणारे ठरणार आहे. तरी लवकरात लवकर हे कार्यालय काळेवाडी परिसरातील एखाद्या सोयीच्या ठिकाणी पुन्हा हलवण्यात यावे, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

मी ज्येष्ठ नागरिक असून मला माझ्या घरातील वीज बिल व त्या संबंधीची काम करण्यासाठी नेहमी महावितरण कार्यालयात जावे लागते. परंतु ही सेवा देणारे कार्यालयच आता बिजलीनगर येथे गेल्याने माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार असून तेथे जाणे - येणे वेळखाऊ ठरणार आहे.
- गणेश माने, ज्येष्ठ नागरिक, काळेवाडी

मी गृहिणी असून घरातील पुरुष मंडळी नोकरीला असतात. त्यामुळे
घरातील सगळे काम माझ्याकडे असून वीज बिल, पाणीपट्टी, गॅस व इतर गोष्टींसाठी बाहेर पडावे लागते. महावितरण कार्यालय लांब गेल्याने त्रास वाढणार आहे.
- स्वाती महाडिक, रहाटणी


थेरगावच्या स्विस काऊंटी येथील कार्यालयात येणे-जाणे नागरिकांना त्रासदायक ठरत होते. हा परिसर एकांतात व कार्यालय मागील बाजूस असल्याने तेथे चोरी व लुटमारीच्या घटनाही घडल्याचे उघडकीस आले होते. त्याविषयी नागरिकांनी तक्रार केली होती. सध्या तात्पुरत्या स्वरूपात बिजलीनगर येथे कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर चिंचवडच्या लिंक रोडवर ते हलविले जाईल.
- शीतल मेश्राम, सहाय्यक अभियंता, महावितरण विभाग, काळेवाडी

SVW25A00055

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Rummy: कृषीमंत्री कोकाटेंच्या 'रमी' व्हिडिओनंतर ऑनलाईन गेमिंगवर बंदी येणार का? फडणवीस काय म्हणाले होते?

Ahilyanagar: डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते अनावरण: संग्राम जगताप; २७ जुलैला हाेणार अनावरण

WCL 2025 Video: क्रिकेटमध्ये पुन्हा बॉल-आऊट! द. आफ्रिकेने विंडीजवर मिळवला थरराक विजय

Mumbai News: अनधिकृत बांधकामाला अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन! न्यायालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाईची टांगती तलवार

Yashwant Dange: साडेतीनशे घरांमध्ये डेंगीसदृश अळ्या: यशवंत डांगे; सात हजार घरांना भेटी देत औषधोपचार, ५५० पाणीसाठे नष्ट

SCROLL FOR NEXT