पिंपरी-चिंचवड

ज्येष्ठांच्या जीवाशी खेळ, निकृष्ट दर्जाच्या औषधांचे वाटप

CD

काळेवाडी, ता.२१ : थेरगाव महापालिका रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या औषधांचे वाटप होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला. रुग्णाच्या नातेवाईकाने ते निदर्शनास आणून दिल्यावर त्या गोळ्या नजरचुकीने देण्यात आल्याची सारवासारव रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली. तसेच संपूर्ण १६ हजार ४०० गोळ्यांची बॅच महापालिकेच्या भांडार विभागाला परत पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले.
काळेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक शकुंतला भुतेकर आणि त्यांच्या मुलाला हा धक्कादायक अनुभव आला. थेरगाव रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णालयाच्या औषध विभागातून नियमित दर महिन्याला लागणाऱ्या औषधी गोळ्या भुतेकर यांना देण्यात आल्या. त्यातील गोळ्या घरी घेऊन गेल्यानंतर भुतेकर यांच्या मुलाला गोळ्या नेहमीपेक्षा वेगळ्या व काळपट असल्याच्या दिसून आल्या. गोळ्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या गोळ्या निदर्शनास आणून दिल्यावर रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली.

दुसऱ्यांदा प्रकार ?
रुग्णाने या औषधी गोळ्या अनवधानाने घेतल्या असत्या, तर त्याचा परिणाम काय झाला असता ? त्याची जबाबदारी कोणाची ? हा प्रश्न यनिमित्ताने उपस्थित होत आहे. असाच प्रकार काही दिवसांपूर्वीही झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्यांदा हा प्रकार समोर आला आहे. यामुळे औषधांचा साठा, खरेदी प्रक्रिया आणि गुणवत्ता तपासणी याबाबत प्रशासनाने पुरेशी दक्षता घेतली का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

गुणवत्ता तपासणी हवी
या रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण व ज्येष्ठ नागरिक उपचारासाठी येतात. आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना खासगी रुग्णालयांचा पर्याय परवडत नाही, अशा परिस्थितीत महापालिका रुग्णालय हेच त्यांचे एकमेव आधारस्थान आहे. आरोग्य विभागाने तत्काळ संबंधित औषधांच्या नमुन्यांची तपासणी करून दोषी पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच औषध खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणून गुणवत्ता तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

कारवाईची मागणी
निकृष्ट औषध देणे किंवा कालबाह्य औषधांचा पुरवठा होणे, त्याचे वितरण होऊन ते रुग्णांपर्यंत जाणे हा धक्कादायक प्रकार आहे. यासाठी जबाबदार कर्मचारी, त्यावरील अधिकाऱ्यांवर प्रशासन कारवाई करेल का ? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. केवळ औषध साठा नष्ट करणे किंवा त्या कंपनीकडे परत पाठवणे हा मार्ग बरोबर आहे का ? असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

भांडाराचाही बेजबाबदारपणा
- अनुभवी, जबाबदारी डॉक्टर औषधे वितरण ठिकाणी नसणे
- ज्येष्ठांना औषधे कशी घ्यायची आहेत का हे समजावून न सांगणे
- रुग्णांना योग्य त्या माहितीसाठी सेवा केंद्राचा अभाव
- मुख्य औषधे भांडारातील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा

थेरगाव रुग्णालयात देण्यात आलेल्या गोळ्या घरी नेल्यानंतर निकृष्ट असल्याचे लक्षात आले. परंतु जर अनवधानाने माझ्या आईने त्या घेतल्या असत्या व त्यातून बरे वाईट झाले असते, तर यास कोण जबाबदार होते ? या गोळ्या परत पाठवणे किंवा त्या संदर्भात कारवाई करणे हा मुद्दा नसून रुग्णांच्या जिवाशी खेळण्यापेक्षा रुग्णालयात काळजी घेणे गरजेचे आहे.
- सुहास भुतेकर, रुग्णाचा मुलगा, काळेवाडी

निकृष्ट प्रतीच्या गोळ्या असल्याचे लक्षात आल्यानंतर सदर साठा व त्या पूर्ण आलेल्या गोळ्या भांडार विभागाकडे परत पाठविण्यात आल्या आहेत. यासंदर्भात चौकशीचे व कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसे लेखी पत्र देण्यात आले असून रुग्णालयाकडून रुग्णाला दिलगिरीचे पत्र दिले आहे.
- डॉ. राजेंद्र फिरके, प्रमुख, थेरगाव रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget Session: अधिवेशन सुरू होण्याआधीच रणसंग्राम! बहिष्कार, सरकारला 6 गंभीर मुद्द्यांवर घेरण्याची तयारी, काय आहे विरोधकांचा प्लॅन?

Ozar Bus Stand : ओझर बसस्थानकात अखेर पाच वर्षांनंतर लालपरीची ‘घरवापसी’! आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन झुकले

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

SCROLL FOR NEXT