काळेवाडी, ता. २७ : रहाटणी परिसरातील गोडांबे चौक सध्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत आहे. चौकात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक, अपुरी नियोजन व्यवस्था आणि नियमांचे उल्लंघन यामुळे येथे सतत कोंडी होत असून किरकोळ ते गंभीर अपघातांच्या घटना घडत आहेत. परिणामी वाहनचालकांमध्ये वादविवादाचे प्रकारही वाढले असल्याचे दिसून येत आहे.
गोडांबे चौक हा रहाटणी, पिंपळे सौदागर आणि काळेवाडी परिसरांना जोडणारा महत्त्वाचा चौक आहे. सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत येथे वाहनांची मोठी गर्दी होते. मात्र सिग्नल व्यवस्थेचा अभाव, रस्त्यांची अरुंद रुंदी आणि बेशिस्त पार्किंग यामुळे चौकात वारंवार कोंडी निर्माण होते. अनेकदा दुचाकीस्वार सिग्नल न पाळता चुकीच्या दिशेने जात असल्याने अपघातांची शक्यता अधिक असल्याचे दिसून येते.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चौकात वाहतूक पोलिसांची नियमित उपस्थिती नसल्याने परिस्थिती नियंत्रणा बाहेर असून. किरकोळ धडकेनंतर वाहनचालकांमध्ये वारंवार वाद होतात, काही वेळा हाणामारीची वेळही येते.
या परिसरात दाट लोकवस्ती व महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी याठिकाणी यावे लागते त्यामुळे रस्ता ओलांडताना वाहने जोरात आल्याने मोठा धोका पत्करावा लागतो. स्थानिकांनी चौकात सिग्नल यंत्रणा बसविणे, झेब्रा क्रॉसिंगचे स्पष्ट मार्किंग करणे, वेगमर्यादा फलक लावणे आणि वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करणे, इत्यादी मागण्या केल्या आहेत.
---
वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे गोडांबे चौकातील समस्या तातडीने सोडविण्याची गरज आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करावी.
- दिनेश यादव, राहिवासी
---
याठिकाणी सायंकाळी व सकाळी मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. कायमस्वरूपी वाहतूक मदतनीस किंवा पोलीस कर्मचारी नेमल्यास महत्त्वाचे ठरेल.
- सुनीता साळवे, राहिवासी
गोडांबे चौकात कस्पटे लॉनच्या जवळील मार्केटला महापालिकेचे दोन पोल आहेत. त्यामुळे तेथे मोठी अडचण होत आहे. जर महापालिकेने ते पोल हटवले तर वाहतूक कोंडी होणार नाही असे सुचवावेसे वाटते, त्याचप्रमाणे गरज भासेल त्या त्यावेळी तेथे वाहतूक मदतनीस उपलब्ध करून देण्यात येतात
- सुदाम पाचोरकर, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग सांगवी
---
फोटो
99437
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.