काळेवाडी ता. १० : काळेवाडी, रहाटणीत अनेक ठिकाणी पथदिवे बंद; तर काही ठिकाणी पथदिवेच नाहीत. काही अंतर्गत भागांत अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्री आणि पहाटे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पिंपरी पूल ते विजयनगर आणि ‘बीआरटी’कडील रस्ता, माने शाळा रस्ता, जोतिबा नगरमधील काही भाग, तापकीर मळा या भागांत अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याची नागरिकांनी तक्रार केली आहे. अंधारामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी केल्या, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. काही ठिकाणी पथदिवे दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी येतात, पण समस्या कायमस्वरूपी सुटत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंद पथदिवे तत्काळ सुरू करावेत. नियमित देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आमच्या परिसरात काही भागांत पथदिवे आहेत. मुख्य चौकात काही ठिकाणी पथदिव दिसतात. पण, काळेवाडीत नदी काठ व अंतर्गत भागात गैरसोय आहे. तांबे चौकाकडील रस्ता पथदिव्यांच्या प्रतीक्षेत आहे.
- सुधीर शिरुडे, रहिवासी, काळेवाडी
तापकीर मळा भागात अनेक ठिकाणी पत्रा शेड व गोडाऊन आहेत. या ठिकाणी पथदिव्यांचा अभाव आहे. त्यामुळे महिलांना एकटे जाण्यासाठी हा परिसर सुरक्षित नाही.
- संदीप दुसाने, व्यावसायिक, तापकीर मळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.