पिंपरी-चिंचवड

पंचनाथ महाराज उत्सव काळेवाडीमध्ये उत्साहात

CD

काळेवाडी, ता.१२ : काळेवाडी ग्रामस्थ आणि पंचनाथ उत्सव समितीतर्फे आयोजित श्री पंचनाथ महाराज उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानिमित्त पालखी मिरवणुकीबरोबरच मनोरंजनाचे कार्यक्रम आणि कुस्त्यांचा आखाडा रंगला.
उत्सवाच्या पहिल्या मुख्य दिवशी सकाळी ग्रामदेवतेची पारंपरिक पद्धतीने अभिषेक व महाआरती झाली. त्यानंतर उत्सव समितीच्यावतीने प्रसाद वाटप झाले. सायंकाळी पंचनाथ महाराजांचा पालखी सोहळा झाला. ज्योतिबा पादुकाचे पूजन करुन गणपती मंदिर, ज्योतिबानगर, आझाद चौक येथून ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काळेवाडी गावठाण मार्गे पंचनाथ चौकात आली. उत्सवानिमित्त ‘मदमस्त अप्सरा’ हा लावण्यांचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी ज्योतिबा उद्यान येथे पंचनाथ केसरी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये २५ किलोपासून ते खुल्या वजन गटांतील मल्लांनी कुस्तीत सहभाग नोंदविला. यावेळी ‘पंचनाथ केसरी’ची अंतिम कुस्ती अक्षय मंगवडे (महाराष्ट्र चॅम्पियन) व दिल्लीचा मल्ल अजय गुज्जर (हिंद केसरी) यांच्यात झाली. ‘पंचनाथ केसरी’ किताब आणि चांदीची गदा मंगवडे याने जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

SCROLL FOR NEXT