पिंपरी-चिंचवड

शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून १०० कोटी रुपयांचे कर्जवाटप

CD

तळेगाव दाभाडे, ता.१० ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी एक एप्रिलपासून सुमारे १०० कोटी रूपये कर्ज वाटप केले जाणार आहे. त्यासाठी शासनाच्या व्याज अनुदानाचा फायदा शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे, अशी माहिती बॅंकेचे संचालक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांनी दिली.
तळेगाव दाभाडे येथील बँकेच्या शाखेत माऊली दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली बॅंक वसुली अधिकारी, शाखा अधिकारी यांची संयुक्त सभा शनिवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी, ते बोलत होते. या सभेला बॅंकेचे उपव्यवस्थापक संजय शितोळे, विभागीय अधिकारी गुलाब खांदवे, बॅंक वरिष्ठ अधिकारी धवलराज पवार, नीलेश खोतसह बँक अधिकारी तसेच योगेश राक्षे, बाबुराव येवले, गणेश काजळे उपस्थित होते.
दाभाडे म्हणाले,‘‘शेतकऱ्यांना १० लाख रुपयांपासून ४० लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जाणार आहे. ही कर्जे एक एप्रिलपासून दिली जाणार आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या कर्ज विभागात संपर्क करावा. केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकरी बांधवांना जे कर्ज दिले जाते. त्या कर्जावरील व्याजासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान व व्याजात सूटही दिली जाते.’’

या शासकीय योजनांद्वारे शेतकऱ्यांना कर्ज वितरण
- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम.
- कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
- कृषी पायाभूत सुविधा निधी.
- वसंतराव नाईक विमुक्त जाती-भटक्या जमाती विकास महामंडळ व इतर अनुषंगिक योजना

विविध कारणांसाठी कर्जपुरवठा होणार
शेतकऱ्यांना शेती, शेतीपूरक जोडधंदा, गाई, म्हैस, शेळ्या मेंढ्यापालन, कुकुटपालन तसेच
यांत्रिकीकरण, टॅक्टर व इतर शेतीयंत्र खरेदीसाठी बँकेकडून कर्जपुरवठा केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drowning Incident: खडकीत आईसह दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना, सरपण आणायला गेले अन् तिघांचा जीव गेला..

Kolhapur Accident News : डंपर पंक्चर झाला म्हणून थांबला अन्, जिवावर बेतला; समोर जळत होता पण...

Cancer Treatment Breakthrough : कर्करोगावर क्रांतीकारी बदल, ‘रेडिएशन’ आणि ‘केमोथेरपी’ ऐवजी मिळणार ‘इम्युनोथेरपी’; रुग्णांचे आयुष्य वाढणार

Bhima River Water issue: भीमा नदी पाणीप्रश्नी काँग्रेस-भाजप आमने-सामने; श्रेयवादात प्रणिती शिंदेंनी मारली बाजी!

दोन ट्रकच्या मधे कारचा चुराडा, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल, मृतदेह ओळखणंही कठीण

SCROLL FOR NEXT