पिंपरी-चिंचवड

भुशी धरण येथील पर्यटकांवरील बंदी मागे घ्या आमदार शेळके यांची विधानसभेत मागणी

CD

तळेगाव दाभाडे, ता. ९ ः वर्षाविहारासाठी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या भुशी डॅम येथे दोन दिवसांपासून पर्यटकांना लागू करण्यात आलेली प्रवेश बंदी मागे घेण्याबाबत शासनाने जिल्हाधिकारी व रेल्वे खात्याला सूचना द्याव्यात, अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज विधानसभेत केली.
लोणावळ्याच्या भुशी धरण परिसरात घडलेल्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी व रेल्वे खात्याने केलेल्या कारवाईचे तीव्र पडसाद विधानसभेतही उमटले. कारवाईच्या विरोधात आमदार शेळके यांनी आवाज उठवला.
आमदार शेळके म्हणाले, ‘‘भुशी धरणापासून दोन किलोमीटरवर असलेल्या धबधब्यात वाहून गेल्यामुळे पाच जणांना मृत्यू झाला, ही घटना दुर्दैवी होती. त्यानंतर जागेची कोणतीही शहानिशा न करता दोन किलोमीटरवर असलेल्या भुशी धरण येथील विक्रेत्यांच्या टपऱ्या व दुकानांवर जिल्हाधिकारी व रेल्वे प्रशासनाने केलेली कारवाई अन्यायकारक होती. त्यानंतर दोन दिवसांपासून या ठिकाणी पर्यटकांना करण्यात आलेली प्रवेश बंदी चुकीची असून, ती त्वरित मागे घ्यावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT