तळेगाव दाभाडे, ता. ३० ः इंदायणी नदीत फेकून दिलेल्या तिघा मायलेकांचा सव्वा महिना उलटूनही शोध लागत नाही. या हत्याकांडातील पाचव्या महिलेला गुरुवारी अटक केली. कविता विष्णू जाधव (वय ३७, रा. अहमदनगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. नराधाम प्रियकराने समरीन निसार नेवरेकर (वय २५), ईशांत (वय ५), इजान (वय २) यांना इंदायणी नदीत फेकून दिल्याची घटना २२ जुलै रोजी उघडकीस आली होती. या घटनेला सव्वा महिना उलटूनही त्यांचे मृतदेह सापडले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी गजेंद दगडखैर (वय ३७ रा. वराळे), रविकांत भानुदास गायकवाड (वय ४१, रा. अहमदनगर), मध्यस्थी महिला उषा बुधवंत आणि गर्भपात करणारा डॉक्टर अर्जुन पोळ या चौघांना यापूर्वीच अटक केली आहे. कविता गायकवाड हिची चौकशी केली असता तिचा हत्येच्या कटात सहभाग असल्याने निदर्शनास आल्याने तिला गुरुवारी अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.