वाढीव पाणीपट्टीविरोधात एकजूट
पिळवणूक थांबवा : पाच गावांतील शेतकऱ्यांचे निवेदन
तळेगाव दाभाडे, ता. १९ : ‘शेतीची वाढीव पाणीपट्टी रद्द करावी अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल,’ असा ईशारा देवले, सदापूर, वाकसई, डोंगरगाव आणि वरसोली येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
आमदार सुनील शेळके, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, तहसीलदार, संत तुकाराम सहकारी कारखान्याला या शेतकऱ्यांनी लेखी निवेदन दिले आहे.‘‘कृष्णा खोरे विकास महामंडळाने पाणीपट्टीमध्ये अवाजवी वाढ केली आहे. ती शेतकऱ्यांची पिळवणूक करणारी आणि न परवडणारी आहे. त्या मानाने शेतीमध्ये उत्पन्न निघत नाही. मावळ तालुक्यात खरीप हंगामात खूप पाऊस पडतो. मुख्य पीक भातशेतीचे आहे. त्यावेळी शेतकरी इंद्रायणी नदी, नाले, बंधाऱ्यांतून पाणी उचलत नाही. त्याची पाणीपट्टीही पूर्णपणे माफ करावी. शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे म्हणजे सन २०११-२२ पर्यंत जी पाणीपट्टी आकारली जात होती, तसाच कर आकारण्यात यावा. जूनमध्ये नदी-नाल्यांवरील पंप, मोटार अतिवृष्टीमुळे काढून घ्यावेत, असे आदेश पाटबंधारे खात्याकडून शेतकऱ्यांना दिले जातात. परंतु त्यापूर्वीच शेतकरी मोटारी काढून घेतात. तरी देखील पाटबंधारे खाते खरीप हंगामाची पाणीपट्टीची आकारणी करतात. ती वसुली त्वरीत बंद करावी, अन्यथा आम्ही यापुढे शेती करू शकणार नाही. शेतकरी वीज बिल भरतो. शासन आम्हाला कॅनॉलचे पाणी देत नाही, तरीही कॅनॉलचा दर का लावला जातो? ती वसुली त्वरीत थांववावी, जुन्या दराने आकारणी करण्यात यावी,’’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे.
ऊस बिलातून वसुली करू नये
‘‘वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याबाबत 15 दिवसांत निर्णय घ्यावा. तसेच अंतिम निर्णय होईपर्यत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने ऊस बिलातून कुठलीही वसुली करू नये,’’ अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.