पिंपरी-चिंचवड

पशुपक्ष्यांच्या खाद्यासाठी खाऊ गल्लीचे नियोजन

CD

तळेगाव दाभाडे, ता. ४ ः मावळ येथील सहयोग फाउंडेशनच्या वतीने ईगल कंपनीजवळील तळ्याकाठी असलेल्या वृक्षराईमध्ये पशुपक्ष्यांना खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी खाऊ गल्लीचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेचे उद्‍घाटन तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
फाउंडेशनच्या वतीने मातीच्या भांड्यांमध्ये पशूपक्ष्यांसाठी लागणारे खाद्य वनराईमध्ये ठेवले जाणार आहे. तसेच, प्रत्येक आठवड्यातून एक-दोनवेळा त्याठिकाणी जाऊन खाद्य टाकण्यात येणार आहे, असे संस्थापक अध्यक्ष संदीप पानसरे यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुहास गरुड, रोटरी क्लबचे उपाध्यक्ष श्रीशैल मेहंते, सचिव प्रमोद दाभाडे, सोनबा गोपाळे, ज्ञानेश्वर बोराडे, राजेंद्र पाटील, संजय दिवेकर, मोनाली पानसरे आदी उपस्थित होते. पानसरे यांची कन्या आराध्या हिच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या हद्दीतील ईगल तळ्याकाठी मुबलक पाणी व प्रचंड वृक्षराई असल्याने येथे लहान-मोठे हजारो पक्षी वस्ती करून राहत आहेत. त्यांना खाद्याची टंचाई निर्माण होऊ नये, त्यांना सहजरित्या सावली, पाणी आणि अन्न उपलब्ध व्हावे म्हणून, ही खाऊ गल्ली पशू-पक्षांसाठी सुरू करण्यात आल्याचे संदीप पानसरे यांनी सांगितले. उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विवेक भगत यांनी स्वागत आणि आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT