पिंपरी-चिंचवड

निवडणूक बिनविरोध की चुरशीची? संत तुकाराम साखर कारखाना ः नवले, दाभाडे यांच्यासह २२६ उमेदवार इच्छुक

CD

तळेगाव दाभाडे, ता. १० ः श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा ऊर्फ नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांच्यासह बहुतांश विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध की चुरशीची होणार ? अशी चर्चा सुरू झाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूरचा अंतर्भाव आहे. मावळमध्ये आमदार सुनील शेळके, मुळशीमध्ये शंकर मांडेकर तर; शिरूरमध्ये माऊली कटके असे तीन आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आहेत. चिंचवडमध्ये शंकर जगताप हे भाजपचे; तर खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबासाहेब काळे आहेत. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे वर्चस्व असल्याने स्वतः अजित पवार यांनी या निवडणुकीत गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, तीनही आमदारांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोन आमदार नियमात बसत नसल्याने त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे अर्ज दाखल केले आहेत.

तब्बल २२ हजार मतदारसंख्या
मावळ तालुक्यात तळेगाव-वडगाव मतदार संघ - २ हजार २१५ , सोमाटणे-पवनानगर मतदार संघात ३ हजार २१ असे एकूण ५ हजार २३६ मतदार आहेत. पौड-पिरंगुट ३ हजार ५४६, हिंजवडी-ताथवडे ३ हजार ३०८ असे एकूण ६ हजार ८५४ मतदार आहेत व अन्य असे एकूण २२ हजार ९१७ सभासद आहेत.

अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
राज्यातील सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मावळ, मुळशी, शिरूर तीन ठिकाणी त्यांचे आमदार असून हवेली तालुक्यात (चिंचवड) मित्र पक्ष भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे निवडणूक लावायची किंवा बिनविरोध करायची, यासाठी अजित पवार यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विकास कामांना प्राधान्य देण्याची हातोटी आहे. सहकार क्षेत्रात त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या आदेशाने मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कारखान्याच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी अजित पवार जो निर्णय घेतील; तो आमच्या तीनही आमदारांसह सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य राहील.
- सुनील शेळके, आमदार, मावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Asha Bhosle: नातवाला शेवटचा व्हिडिओ कॉल… नातीच्या बोटात नशीबाची अंगठी घातली; आशा भोसलेंचा अखेरचा क्षण, मुलाने केला खुलासा!

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

SCROLL FOR NEXT