पिंपरी-चिंचवड

वसुली अधिकारी, कर्जदार यांच्यात लपाछपीचा खेळ

CD

विजय सुराणा - सकाळ वृत्तसेवा

तळेगाव दाभाडे, ता. १८ ः चालू आर्थिक वर्ष संपत आल्याने शेती विकास संस्था, नागरी पतसंस्था, सहकारी संस्था, बँका यांच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी संस्थांचे अधिकारी थकबाकीदारांच्या घरोघरी जात असून जास्तीत जास्त कर्ज वसुली करण्याचा अहोरात्र प्रयत्न करीत आहेत; तर अडचणीतील कर्ज थकबाकीदार हे वसुली अधिकारी घरी येण्याअगोदरच घरातून गायब होत असल्याने दोघांमध्ये लपाछपीचा खेळ रंगल्याचे चित्र मावळातील गावोगावी दिसत आहे. 
आर्थिक वर्षाचा ३१ मार्च हा शेवटचा दिवस असतो. कर्जदारांकडून कर्जाची परतफेड करुन घेणे, त्याचे ठरलेले हप्ते वेळेतच वसुल करण्याचे धोरण सहकारी संस्था, नागरी पतसंस्था, सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँका राबवित असतात.
घरच्या हलाखीच्या किंवा बेताच्या परिस्थितीनुसार काही जणांना अडचणींवर मात करता येत नाही. त्यामुळे त्यांचे हप्ते थकतात. तसेच त्यांच्या कर्जाची थकबाकी वाढत जाते. ही थकबाकी वसुलीसाठी वसुली अधिकाऱ्यांना खूपच आटापिटा करावा लागतो. मावळ तालुक्यात शेती विकास सहकारी संस्था ५५ आहेत तर नागरी पतसंस्था ४५ आहेत. याशिवाय तालुक्यात ठिकठिकाणी सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँकांची मोठी संख्या आहे.

कोणत्या कारणांसाठी कर्जे ?
- नवीन व्यवसाय चालू करणे
- व्यवसायाच्या वाढीसाठी कर्ज घेण्याकडे कल
- शेती, शेतीची अवजारे, बी-बियाणे खते यासाठी गरज
- गृह बांधणे, दुचाकी, चारचाकी, अनेक गृहोपयोगी वस्तू खरेदी

व्यवस्थापकही मैदानात...
सध्या मावळ तालुक्यात कर्ज वसुली करण्यासाठी सर्व संस्थांचे वसुली अधिकारी, व्यवस्थापक यांना प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागले आहे. थकबाकीदार कर्जदारांची यादी करणे, त्यांना दूरध्वनीवरून संपर्क करणे व वसुलीबाबत नोटिसा काढणे तसेच काही ठिकाणी जप्तीच्या नोटिसा काढणे, अशी न आवडणारी कामे अधिकारी वर्गाला सुद्धा करावी लागत आहेत.

काही अडचणीत आलेले थकबाकीदार हे शक्कल लढवून वसुली पथकांना गुंगारा देत आहेत. वसुली अधिकारी घरी येण्याअगोदरच  महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असल्याचे भासवत आहेत. त्यामुळे ३१ मार्च अखेरपर्यंत कर्जदार आणि वसुली अधिकारी यांचा लपाछपी, शिवणा पाणीचा खेळ चालणार आहे. आपल्या संस्थेची सर्वाधिक वसुली व्हावी, असा प्रयत्न वसुली अधिकारी करत आहेत; तर आर्थिक अडचण असल्यामुळे कर्जदार हा यापासून दूर पळत आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे ३१ मार्चपर्यंत थकबाकीचे प्रमाण १० टक्के राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पतसंस्था, बँका वसुलीसाठी तगादा लावत आहे. कर्ज वसुली हा कोणत्याही सहकारी संस्थेचा आत्मा आहे. वेळेवर वसुली झाली की नवीन कर्जदारांना कर्ज पुरवठा करता येतो. ठेवीदार सभासदाच्या ठेवी मागणी नुसार परत करता येऊ शकतात. त्यामुळे सहकार चळवळीवरील लोकांचा विश्वास वाढण्यास मदत होते. 
- सर्जेराव कांदळकर, सहाय्यक निबंधक, मावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Mock Drill: मॉक ड्रिलदरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट; अहिल्यानगरात चार पोलिस कर्मचारी जखमी, ग्रेनेडची पिन पडली अन् काय घडलं!

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

SCROLL FOR NEXT