पिंपरी-चिंचवड

कामशेत पोलिस ठाण्याशेजारील दुकानात चोरी

CD

तळेगाव दाभाडे, ता. १५ : कामशेत येथील किराणा साहित्याच्या दुकानातून चोरट्यांनी एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे, हे दुकान पोलिस ठाण्याशेजारीच आहे. त्यामुळे चोरट्यांनी डाव साधल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
या प्रकरणी महावीर सुखमल जैन यांनी फिर्याद दिली आहे. जैन यांचे पोलिस ठाण्याशेजारी भोला ट्रेडर्स नावाने दुकान आहे. मंगळवारी (ता.१५) पहाटे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील ऐवज पळवला. दरम्यान, चोरट्यांनी गेल्यावर्षी महावीर जैन यांच्याच दुकानातून तब्बल २५ लाखांचा ऐवज लंपास केला होता. गेल्या वर्षभरात अनेक दुकाने घरफोड्या झाल्या, मात्र गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे कामशेत शहरातील चोऱ्या थांबवण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी रोहिदास वाळुंज, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विलास भोवरा, सुभाष रायसोनी यांनी केली आहे.

वर्षभरात २५ चोऱ्या, तपासात अपयश
कामशेत शहरातील चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, गेल्या वर्षभरात शहर परिसरात चोरीच्या विविध २५ घटना घडल्या आहेत. पण, एकाही प्रकरणातील चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

Hasan Mushrif Kolhapur Politics : जिल्हा बँक, गोकुळ, झेडपी, बाजार समिती आणि मंत्रीपद, मुश्रीफांचे ‘सब कुछ कागल’ मग जिल्ह्याला काय

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन अटकेत

Beed Illegal Mining: अवैध खदानीत मृत्यू; पीक विमा उचलून प्रशासनास डल्ला?;ज्ञानेश्वर सावंतच्या खदानीत घोटाळा

SCROLL FOR NEXT